dimbhe dam1.jpg 
पुणे

पुणे-नगरमधील शेतकऱ्यांनो, कुकडीमधील पाणीपातळीत होतेय घट!

सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव (पुणे) : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या डिंभे धरणात शनिवारी (ता.16) 3.89 टीएमसी (31.15 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून सुरू असलेल्या विसर्गामुळे धरण साठ्यातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. डाव्या कालव्याला 20 मार्चपासून 600 क्‍युसेक तर उजव्या कालव्याला 26 मार्चपासून 220 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. 

गेल्या वर्षी अंतिम टप्प्यात धरणातील पाणी संपल्याने आंबेगाव-शिरूर येथील बागायत क्षेत्रांना मोठा फटका बसला होता. राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावर्षी लक्ष घालून अंतिम टप्प्यात पाणी सुरू राहील, यावर लक्ष केंद्रित केले आहे. आंबेगाव तालुक्‍यातील डिंभे धरण आणि जुन्नर तालुक्‍यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा आणि घोड या सहा धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार झाला आहे. 

यामध्ये डिंभे धरण सर्वांत मोठे आहे. या धरणाचा 12.50 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पातील पाण्यावर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, करमाळा हे तालुके आणि पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, जुन्नर हे तीन तालुके अवलंबून आहेत. कुकडी प्रकल्पातील पाणी वाटपावर पुण्याबरोबरच नगर जिल्ह्याचे देखील लक्ष असते. धरणामधील पाण्याचा कालव्यांव्दारे सतत विसर्ग सुरू असल्याने धरणामध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे. 

या पाण्याचा सर्वांत जास्त फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या मालाला गेली दोन महिने बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. परंतु ऊसाच्या क्षेत्रामुळे काही शेतकरी त्यातून तारले गेले आहेत.

पुढील वर्षी हक्काचे उत्पादन म्हणून शेतकरी ऊस पिकाकडे पाहत आहेत. कुकडी प्रकल्पातील 16 मेच्या आकडेवारीनुसार डिंभे धरणात 31.15 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT