Anil Kakodkar
Anil Kakodkar sakal
पुणे

Anil Kakodkar : देशासाठी तरुणाईने स्वतःच्या तंत्रकुशलतेचा विनियोग करावा ; ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘अणुतंत्रज्ञान हे केवळ लष्करी सामर्थ्याशी न जोडता समाजाच्या हितासाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीत त्याचा उपयोग करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. हे लक्षात घेत तरुणाईने स्वतःच्या तंत्रकुशलतेचा देशाच्या विकासासाठी विनियोग केला पाहिजे,’’ असे मत केंद्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी सोमवारी केले.

दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) च्यावतीने, ३० व्या स्थापनादिनानिमित्त लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीएमई) चे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए.के. रमेश यांच्या हस्ते डॉ. काकोडकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्याला ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, ‘एआयटी’चे अध्यक्ष मेजर जनरल टी.एस.बेन्स, सहसंचालक कर्नल एम.के.प्रसाद, प्राचार्य डॉ.बी.पी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.काकोडकर म्हणाले, ‘‘आधुनिक काळात जागतिक स्तरावरील नेतृत्वाची तंत्रज्ञान हीच गुरुकिल्ली आहे. मर्यादित साधनस्रोतांमध्ये, कमी खर्चात आपण विकसित केलेले रिफ्लेक्टर्स हे तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराचे उत्तम उदाहरण आहे. भावी काळातील जागतिक नेतृत्व तंत्रज्ञानाच्या कुशल वापरातून पुढे येणार आहे. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केल्यास समाज व देशाचे शोषणमुक्त सक्षमीकरण सहज शक्य आहे.’’

ए. के. रमेश म्हणाले, ‘‘जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचे प्राबल्य असणार आहे. शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी तंत्रकुशलता घेऊन स्वतःचा वाटा उचलण्याच्या असंख्य संधी आहेत. नव्या जगात कौशल्ये, तंत्रस्नेही वावर यांच्या एकत्रीकरणातून ज्ञानाचे मार्ग निर्माण होणार आहेत.’’

यावेळी संस्थेचे माजी विद्यार्थी अंकुश तिवारी यांचा यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विविध शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा अभ्यासक्रम लवकरच सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी विद्यार्थ्यांच्यावतीने प्रणव बैरागी यांनी मनोगत मांडले. मेजर जनरल टी. एस. बेन्स यांनी आभार मानले. दीक्षा सिंग आणि अनिकेत डिगोळे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCERT Syllabus: शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलीबद्दल का शिकवायचे? ; 'बाबरी मशीद'चे नाव हटवल्यानंतर NCERT संचालकांचा सवाल

" 'Maharashtra 104'चा धुमाकूळ," वाचा नेमकी काय आहे भानगड

Smriti Mandhana: स्मृतीचं द. आफ्रिकेविरुद्ध खणखणीत विक्रमी शतक! 'हा' पराक्रम करणारी दुसरीच भारतीय महिला क्रिकेटर

ईव्हीएम अन् ओटीपी... वायकर-किर्तीकर मतमोजणी प्रकरणात ECI अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Internet Problem : फोनमध्ये फुल नेटवर्क,पण इंटरनेट चालत नाहीये? पटकन वापरा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT