33 people were found to be corona positive In the a wholesale drug store in Sadashiv Peth.jpg 
पुणे

पुणेकरांची चिंता वाढली; सदाशिव पेठेत औषधाच्या दुकानातील 33 जण कोरोना पॉझिटीव्ह!

सकाळवृत्तसेवा

पुणे : सदाशिव पेठेतील घाऊक औषधांच्या एकाच दुकानात 33 कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. आतापर्यंत औषधक्षेत्रातील 40 जणांची कोरोना टेस्ट प|झिटीव्ह आली आहे. 

पुण्यावर नामुष्की : अॅम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू

पुण्यात आतापर्यंत तीन हजारा रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. सदाशिव पेठेतील औषधांच्या घाऊक दुकानातील तीन कर्माचाऱयांना बुधवारी कोरोनाचा संसर्ग झाल्याने शुक्रवारपासून तीन दिवस ही बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. येत्या सोमवारी (ता. 17) ही बाजारपेठ पूर्ववत सुरू होणार असल्याचे केमिस्ट असोसिएशन आँफ पुणे डिस्ट्रिक्टतर्फे (सीएपीडी) कळविण्यात आले आहे. या दरम्यान, दुकानांचे निर्जंतूकिकरण आणि कर्माचाऱयांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सदाशिव पेठेतील घाऊक औषधांच्या बाजारपेठेतील एका दुकानातील 33 कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्याची माहिती पुढे येत आहे. कोरोना चाचणी केलेल्या अजूनही काही कर्मचाऱयांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ही संख्या वाढण्याचा धोक व्यक्त करण्यात येतो. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सदाशिव पेठेतील घाऊक बाजारपेठेतू औषध घेऊन किरकोळ दुकानादारांपर्यंत ती पोचविण्याचे काम हे कर्मचारी करतात. त्यामुळे या दरम्यान ते कोणा-कोणाला भेटले, त्यांच्या संपर्क कोणाशी आला, याची माहिती घेण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT