36 grams of cocaine 1 kg of mephedrone  worth Rs 67 lakh seized from foreigners in Pune
36 grams of cocaine 1 kg of mephedrone worth Rs 67 lakh seized from foreigners in Pune 
पुणे

पुण्यात फॉरेनरकडून ६७ लाखांचे ३६ ग्रॅम कोकेन,1 किलो मॅफेड्रोन जप्त

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातील एका फ्लॅटमध्ये कारवार्इ करीत सहा परदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ६८ लाख ८६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक आरोपींमध्ये एक महिलेचा देखील समावेश आहे. आरोपींकडून १३६ ग्रॅम ८०० मिलीग्रॅम वजनाचे व ९ लाख ५७ हजार ६०० रुपये किमतीचे कोकेन आणि एक किलो १५१ ग्रॅम वजनाचे व ५७ लाख ५५ हजार रुपये किमतीचे मॅफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून ५४ हजार रुपये रोख, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, प्लास्टिक पिशव्या असा १ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मनफ्रेड दाऊद मंन्डा (वय ३०), अनास्टाझिया डेव्हिड (वय २६), बेका हसीम फॉऊमी (वय ४२), हसन अली काशीद (वय ३२, सर्व रा. टांझानिया), शामिन नंन्दावुला (वय ३०) आणि पर्सी नार्इगा (वय २५, दोघेही रा. युगांडा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पथकातील पोलिस नाईक मनोज साळुंके यांना माहिती मिळाली होती की, पाच ते सहा परदेशी नागरिक उंड्रीत एका घरात कोकेन आणि एमडी विकत आहेत. त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली. माहितीची खात्री पटल्यानंतर अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे आणि सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड, सहायक निरिक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलिस अंमलदार प्रवीण शिर्के, राहुल जोशी, मारुती पारधी, पांडुरंग पवार, रूबी अब्राहम, मनोज साळुंके, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, विशाल दळवी, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी ही कारवार्इ केली. या गुन्ह्याचा तपास पथकाचे पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर करीत आहेत.


अटक करण्यात आलेले परदेशी नागरिक विद्यार्थी, व्यवसाय आणि वैद्यकीय व्हिसावर शहरात राहत होते. शहरातील विविध भागात हे अमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवार्इ करण्यात आली.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे शहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT