37 new Corona positive patients on Tuesday in east haveli
37 new Corona positive patients on Tuesday in east haveli 
पुणे

पुर्व हवेलीत कोरोनाचा उद्रेक; मंगळवारी दिवसभरात एवढे नवीन रुग्ण

जनार्दन दांडगे, सकाळवृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पुर्व हवेलीत मंगळवारी (ता. ४) दिवसभरात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असुन, पुर्व हवेलीमधील सात प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे तब्बल ३७ नवीण रुग्ण आढळून आले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणी काळभोर (१३), कुंजीरवाडी (८), उरुळी कांचन (५), कदमवाकवस्ती (६), सोरतापवाडी (३),  थेऊर (१) व आळंदी म्हातोबाची (१) या सात प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी दिवसभरात तब्बल ३७ रुग्ण आढळून आल्याची कबुली लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी,  डॉ. डि. जे. जाधव यांनी दिली आहे तर, मंगळवारी पाठवलेल्या सत्तरहुन अधिक जनांच्या स्वॅब (घशातील द्रव) चे रिपोर्ट येणे बाकी असल्याने, ही संख्या आनखी वाढण्याची शक्यता डॉ. जाधव यांनी व्यक्त केली आहे. 

 पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

कोरोनाने जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुर्व हवेलीमधील उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी व कदमवाकवस्ती या प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाने चांगलाच धुमाकुळ घातला होता. याच दरम्यान पुणे शहरसह शहरालगतच्या २३ विविध ग्रामपंचायत हद्दीत लॉकडाऊन लादल्याने, मागील दहा दिवसात कोरोना आटोक्यात आल्याचे दिसून येत होते. पुर्व हवेलीमधील वाघोली व मांजरी बुद्रुक या दोन ग्रामपंचायती वगळता, पुर्व हवेलीमधील विविध गावात कोरोनाचे रुग्ण हातावर मोजता येतील या संख्येत आढळुन येत होते. मात्र मागील चार दिवसापासुन कोरोनाने पुन्हा एकदा वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी दिवसभरात केवळ सात ग्रामपंचायत हद्दीत तब्बल ३७ रुग्ण आढळुन आले आहेत.

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

याबाबत अधिक बोलतांना डॉ. डि. जे. जाधव म्हणाले, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व उरुळी कांचन या प्रमुख चार ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमानात वाढु लागले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमुख नागरीकांचा निस्काळजीपणा आहे. मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असतानाही, नागरीक विना मास्क फिरत असल्याचे चित्र सर्वत्रच दिसुन येत आहे. तर भाजीपाला बाजार असो वा किराना दुकान, वरील सर्व ठिकाणी पाहिल्यास, सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला आहे. यामुळे पुर्व हवेलीत कोरोना वाढीचा वेग पुन्हा वाढला आहे. नागरीकांनी स्वतःची काळजी स्वतः घेण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT