शिवरायांच्या त्रिमितीय रांगोळीची 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद Sakal
पुणे

शिवरायांच्या त्रिमितीय रांगोळीची 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद

ही फक्त रांगोळी नसून आज्ञापत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व राजमुद्रा विविध रंगाच्या रांगोळीतून साकारण्यात आली आहे.

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिमितीय रांगोळीची इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक दर्शन फुलपगार यांनी दिली.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टे पाटील मैदानावर ही विश्वविक्रमी रांगोळी माजी आमदार शरद सोनवणे यांच्या संकल्पनेतुन साकारण्यात आली आहे.

ही फक्त रांगोळी नसून आज्ञापत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व राजमुद्रा विविध रंगाच्या रांगोळीतून साकारण्यात आली आहे. महेंद्र मेटकरी,भाग्यश्री देशपांडे, शेखर दरदरे यांचेसह ३० कलाकारांनी सलग तीन दिवस २३० x१२० फूट (२७,६०० चौरस फूट) क्षेत्रात ही रांगोळी साकारली. यासाठी यासाठी १६ हजार किलो रांगोळी लागली आहे.

त्रिमितीय रांगोळीची इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असल्याचे प्रमाणपत्र संयोजकांना देण्यात आले आहे. रांगोळी कलाकार महेंद्र मेटकरी, भाग्यश्री देशपांडे, शेखर दरदरे यांना देखील प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.ही त्रिमितिय रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक तसेच अनेक शिवभक्त गर्दी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT