Sakal Cooperation Mahaparishad sakal
पुणे

Sakal Cooperation Mahaparishad: ‘सकाळ’तर्फे तिसरी सहकार महापरिषद;पुण्यात येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये आयोजन

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे येत्या ऑगस्टमध्ये पुण्यात तिसऱ्या दोनदिवसीय सहकार महापरिषदेचे (सकाळ महाकॉन्क्लेव्ह-२०२४) आयोजन केले आहे. या महापरिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे येत्या ऑगस्टमध्ये पुण्यात तिसऱ्या दोनदिवसीय सहकार महापरिषदेचे (सकाळ महाकॉन्क्लेव्ह-२०२४) आयोजन केले आहे. या महापरिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रस्तुत सहकार महापरिषदेत सहकारी बँकिंग, पतसंस्था, साखर उद्योग आणि डेअरी उद्योगासमोरील आव्हाने व उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा होणार आहे. महापरिषदेत केंद्र आणि राज्यातील धोरणकर्त्यांशी थेट संवाद साधता येणार आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’ने यापूर्वी दोन ऑक्टोबर २०२१ आणि १७ व १८ फेब्रुवारी २०२३ रोजी सहकार महापरिषदेचे आयोजन केले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये आयोजित सहकार महापरिषदेस केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या सहकार महापरिषदेतही केंद्र आणि राज्यातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’ने नागरी सहकारी बँकिंग, पतसंस्था, साखर उद्योग क्षेत्रातील प्रश्नांवर चर्चा घडवून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा प्राप्तिकर माफ होण्यासह सहकारी बॅंकिग आणि पतसंस्थांचे विविध प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर यंदा पुण्यामध्ये तिसऱ्या सहकार महापरिषदेचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT