corona1.jpg 
पुणे

खडकवासला येथील ब्युटी पार्लर चालक महिलेच्या घरातील सदस्यांचा कोरोना रिपोर्ट...

सकाळवृत्तसेवा

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला (ता. हवेली) येथील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेच्या घरातील 4 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ज्या ज्या महिलांना 'त्या'  महिलेने 'होम सर्व्हिस ' दिली होती. त्यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे. आज खडकवासला येथील तब्बल 6 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खडकवासला येथील एकूण रुग्ण संख्येचा आकडा 44 वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी 2 रुग्ण बरे झालेले आहेत तर 42 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली. दोन दिवसांपूर्वी खडकवासला येथील मोठा भाजी विक्रीचा व्यवसाय असणारा भाजीविक्रेता पॉझिटिव्ह आल्यानंतर खडकवासला येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातच आता ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या घरातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने महिला वर्गाला धडकी भरली आहे. 'ती' ब्युटी पार्लर चालक महिला खडकवासला गावातील महिलांना ब्युटी पार्लर बंद असल्याने 'होम सर्व्हिस ' देत होती.

दरम्यान, खडकवासला गावातील रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील लॉकडाउनच्या काळात एकही रुग्ण नसलेल्या खडकवासला गावाची रुग्णसंख्या मागील पंधरा दिवसांमध्ये तब्बल 44 वर जाऊन पोहोचली आहे. एका एका घरातील पाच ते दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने खडकवासला गावची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या नांदेड पासून ते खानापूर पर्यंत सर्वात जास्त रुग्ण संख्या खडकवासला गावची झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील इतर व्यक्तींची तातडीने माहिती मिळवणे व त्याची तपासणी करणे यावर आरोग्य विभागाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी याबाबत सर्व्हे करण्यासाठी 15 शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. परंतु, सदर शिक्षक हजर झाल्याचे आढळून येत नाही. "वाढत्या रुग्ण संख्येला आवर घालण्यासाठी नागरिकांनीही मास्क वापरणे व  सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे तसेच काही लक्षणे दिसल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सचिन खरात यांच्याकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IITM Pune News: दशकभराचा मॉन्सून अंदाज आता शक्य; पुण्यातील संशोधनाची मोठी झेप, ‘आयआयटीएम’ची नवी ‘प्रणाली’!

Mangalwedha Exam Centre:दाढी, मिशीमुळे संशय अन्‌ तोतया विद्यार्थ्यांचा भांडाफोड; केंद्र मंगळवेढ्यात विद्यार्थी बेळगाव, सांगली, कोल्हापूरचे!

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूल आणि एअर फोर्स बाल भारती स्कूल बॉम्बने उडवण्याची धमकी

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींची काळजी मिटणार ! एकनाथ शिंदेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'ही' मोठी घोषणा

Dajipur Sanctuary Rain : फोंडा घाट, दाजीपूर अभयारण्य परिसरात जोरदार पाऊस; चंदगड तालुक्यालाही पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT