leopard Attack sakal
पुणे

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालक गंभीर जखमी

उंब्रज नं. १ येथे चार वर्षीय आयुष शिंदे हा बालक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला.

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी - उंब्रज नं. १ येथे चार वर्षीय आयुष शिंदे हा बालक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून सदर घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

आयुष सचिन शिंदे (वय-४ वर्ष) हा घराच्या अंगणात खेळत असताना बाजुलाच असलेल्या उसाच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने आयुषवर झडप घातली. यावेळी आयुषच्या वडिलांनी व आईने जोरजोरात आवाज केल्याने बिबट्याने बाळाला तेथेच सोडुन पळ काढला.

सदर घटनेत आयुषच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. आयुषवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वनविभागाला सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आयुष व त्याच्या परिवाराला भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली. सदर घटना वनविभागाच्या निष्काळजीपणा मुळेच घडली असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी कांदळी येथील मंगेश गुंजाळ या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाचा आता लगेच उंब्रज येथे घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

उंब्रजचे सरपंच हिरामण शिंगोटे यांनी सांगितले की, उंब्रज परिसरात ऊसतोडणी सुरु असल्याने सध्या दिवसा देखील बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत होते. परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते.

मागील आठवड्यात वनविभागाला उंब्रज येथील बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्याच्या मागणीचे पत्रदेखील आम्ही दिले होते.तरी देखील वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला नाही. सदर घटनेला सर्वस्वी वनविभाग जबाबदार असुन या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chinchpokli Chintamani : ‘आगमनाधीश’… चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक; संभाजी महाराजांच्या रूपातील प्रतिकृती

'RSS म्हणजे भारतीय तालिबान, त्यांच्याकडून देशात शांतता बिघडवण्याचं काम..'; मोदींच्या कौतुकानंतर काँग्रेस नेत्याची सडकून टीका

Bachchu Kadu : निवडणूक आयोग तुमचा मित्र झाला म्हणून तुम्हाला मस्ती आली; बच्चू कडू यांचा सरकारवर हल्लाबोल

अभिनयानेच दिलं जगण्याचं बळ ! पडत्या काळात एकटीने तारला संसार , ज्योती चांदेकर यांची प्रेरणादायी कारकीर्द

Ratnagiri Monsoon Travel: विकेंड ट्रिपसाठी निसर्गरम्य ठिकाण शोधताय? मग पावसात खुललेलं नंदनवन रत्नागिरीला नक्की भेट द्या!

SCROLL FOR NEXT