Admission 
पुणे

अकरावीला ४१ हजार प्रवेश निश्‍चित; दुसऱ्या फेरीत ४३ टक्के विद्यार्थ्यांना संधी

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ९ हजार ५४ जणांनी प्रवेश निश्‍चित केला आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत ४१ हजार २१ जणांनी प्रवेश घेतला असल्याचे अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने स्पष्ट केले. दुसऱ्या फेरीत पात्र ठरलेल्या केवळ ४३ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने ठप्प झालेली अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरू केली होती. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरल्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी ४६ हजार ७९४ विद्यार्थी पात्र ठरले होते, त्यातील २३ हजार १२० जणांची या फेरीसाठी निवड झाली. त्यामध्ये १० हजार ६५८ विद्यार्थ्यांनी संमती दर्शवली; पण त्यापैकी ९ हजार ९५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश अखेरच्या दिवसापर्यंत निश्‍चित झाले आहेत. १३ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारले आहेत, ५५ जणांनी प्रवेश रद्द केला तर १२ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीच्या प्रवेशास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. 

पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये कॅप राऊंडमधून ३३ हजार १६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. इन हाउस कोट्यातून ४ हजार ९०, अल्पसंख्याक कोट्यातून २ हजार ७००, तर व्यवस्थापन कोट्यातून १ हजार ६८ जण अशा ४१ हजार ३२ जणांनी प्रवेश घेतला आहे. 

तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक आज 
अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता तिसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक गुरुवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता ऑनलाइन जाहीर केले जाणार आहे. यामध्ये रिक्त असलेल्या ६६ हजार जागांवर प्रवेश घेता येणार आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT