मतदानासाठी लागलेल्या रांगा
मतदानासाठी लागलेल्या रांगा Sakal
पुणे

राजगडच्या निवडणूकीत 43.96 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

भोर (पुणे) - अनंतनगर-निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी 43.96 टक्के मतदान झाले. 13 हजार 618 मतदारांपैकी केवळ 5 हजार 987 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 667 महिला मतदार आणि 5 हजार 320 पुरुष मतदारांचा समावेश आहे. महिला मतदारांची टक्केवारी 41.10 तर पुरुष मतदारांची टक्केवारी 44.38 आहे.कारखान्याच्या तीन गटांमधील ७ जागांसाठी रविवारी (ता. 29) मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली आणि ११ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

कारखान्याच्या भोर, वेल्हे व खंडाळा (जि. सातारा) तालुक्यातील 29 मतदानकेंद्रांवर रविवारी सकाळी 9 वाजता मतदान सुरु झाले. सुरुवातीला मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली. पहिल्या दोन तासात केवळ साडेसहा टक्के मतदान झाले. त्यानंतर उमेदवारांनी आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. दुपारी 12 वाजता 19 टक्के मतदान झाले. तर दोन वाजता 31 टक्के मतदान झाले. आणि सायंकाळी 5 वाजता 43.96 टक्के मतदान झाले. आळंदे येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना मतदारांना मतदान करण्यासाठी मार्गदर्शन करीत होते. विठ्ठल बळीराम बुदगुडे (वय 55) या अपंग मतदाराला सत्ताधारी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाडीतून आणून उचलून आळंदेतील मतदान केंद्रावर नेले. केवळ विरोधकच नव्हे तर सत्ताधारी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार हे काही मतदारांपर्यंत पोहोचले नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.

रामचंद्र पर्वती कुडले(राष्ट्रवादी), सुभाष मारुती कोंढाळकर(कॉग्रेस), उत्तम नामदेव थोपटे(कॉग्रेस), सुधीर चिंतामण खोपडे(कॉग्रेस), पंडीत रघुनाथ बाठे(राष्ट्रवादी), विलास अमृतराव बांदल(भाजपा), सोमनाथ गणपत वचकल(कॉग्रेस), पोपटराव नारायण सुके(कॉग्रेस). रामदास किसन गायकवाड(राष्ट्रवादी), दिनकर सोनबा धरपाळे(कॉग्रेस) आणि प्रताप धोंडीबा शिळीमकर(कॉग्रेस) हे उमेदवार निवडणूकीत आपले नशीब आजमावणार आहेत. भोरमधील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) मंगळवारी (ता. 31) सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT