Khadki Encroachment Crime sakal
पुणे

Encroachment Crime : खडकीत रस्ता रुंदीकरणासाठी ४४ दुकाने हटविली; गणेशखिंड रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध

औंध, बाणेरकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे जाण्यासाठी एकमेव रस्ता असणाऱ्या जयकर पथावरील साई चौकातील बॉटलनेट महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंटने आज काढून टाकला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - औंध, बाणेरकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे जाण्यासाठी एकमेव रस्ता असणाऱ्या जयकर पथावरील साई चौकातील बॉटलनेट महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंटने आज काढून टाकला. या रस्त्यातील ४४ दुकाने हटविण्यात आल्याने अतिरिक्त चार लेनचा वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

कारवाईनंतर आज रात्री याठिकाणी लगेच डांबरीकरणाचे काम सुरु झाले. या कारवाईमुळे गणेशखिंड रस्त्यावरील ताण कमी प्रमाणात कमी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

ब्रेमेन चौकाकडून खडकीकडे जाण्यासाठी २४ मीटर रुंदीचा जयकर पथ आहे. पण खडकी स्टेशनच्या पाठीमागच्या बाजूला साई चौक, रेल्वेभुयारी मार्ग या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लष्कराच्या जागेत दुकाने असल्याने केवळ १२ मीटर रस्ता उपलब्ध होता. त्यामुळे रोज सकाळी व सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती.

या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व खडकी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यामध्ये ही दुकाने पाडून टाकण्याचा निर्णय झाला होता. पण कायदेशीर प्रक्रिया, पोलिस बंदोबस्त यामुळे कारवाईच विलंब झाला. अखेर आज दुपारी महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डाने संयुक्त कारवाई करत हा सुमारे २०० मीटरचा रस्ता अतिक्रमण मुक्त केला.

थेट विमानतळ, नगर रस्त्याकडे जाता येणार

गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो व उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. बाणेर, औंध, बालेवाडी, पाषाण या भागातील नागरिकांना विमानतळ, नगर रस्ता, शिवाजीनगर येथे जाण्यासाठी गणेशखिंड रस्त्याशिवाय पर्याय नव्हता.

पण आता आज साई चौक परिसरातील दुकाने काढून टाकल्याने हा सुमारे २०० मिटर लांबीचा बॉटलनेक कायमचा निघाला असल्याने औंध, बाणेर भागातील नागरिकांना एक पर्यायी रस्ता उपलब्ध झाला आहे. गणेशखिंड रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी हे काम करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी वाटोळं केलं', आझाद मैदानात सुप्रिया सुळेंना आंदोलकांनी घेरलं; गाडीवर पाणी बॉटल फेकल्या, VIDEO VIRAL

"या मुलीला मी मनापासून लेक मानलं" प्रियाच्या निधनाच्या बातमीने दिग्दर्शक विजू माने हळहळले; पोस्टमधून कलाकारांची श्रद्धांजली

PM मोदींना जिनपिंग यांनी दिली स्वत:ची कार, पुतीन रशियातून गाडी घेऊन आले पण नंबर प्लेट चीनची

Latest Marathi News Live Updates : आरक्षणासाठी मराठा आंदोलकाचं चिखल मातीत लोटांगण

PKL 2025: ‘टाय-ब्रेकर्स तुमच्या संयमाची परीक्षा घेतात, आणि त्यातूनच आम्ही सामना जिंकलो’, यू मुम्बाचा कर्णधार सुनील कुमार

SCROLL FOR NEXT