corona logo1.jpg 
पुणे

अरे बापरे ! बोपोडीत 48 तासात 47 नवीन कोरोना बाधित रुग्ण  

हरीश शर्मा

खडकी बाजार (पुणे) : बोपोडी परिसरात गेल्या 48 तासात नवीन 47 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यामुळे बोपोडीकरांची चिंता वाढली आहे. आजपर्यंत बोपोडी परिसरात एकूण 72 रुग्ण सापडल्याची नोंद महापालिकेकडे करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीपासून बोपोडीच्या जवळच खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्यास सुरवात झाली होती. खडकी परिसरात मार्च ते 4 जून पर्यंत एकूण 41 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात झाली आहे.  

एप्रिल महिन्यात बोपोडीत एकही रुग्ण सापडला नव्हता तेव्हा महापालिकेने बोपोडी परिसर ग्रीन झोन घोषित केला होता. मात्र, मे महिना उजाडताच बोपोडीमध्ये सर्वात प्रथम एक रुग्ण सापडला तेव्हापासून बोपोडी परिसरात व इतर काही ठिकाणी रुग्ण सापडले. मात्र गेल्या दोन दिवसात कोरोनाने बोपोडीत रौद्र रूप धारण केले व दोन दिवसात तब्बल 47 नवीन रुग्ण सापडले असून आतापर्यंत बोपोडीत एकूण 72 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. झपाट्याने बोपोडीत रुग्ण वाढत असल्यामुळे महापालिका प्रशासन व पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

बोपोडीत सकाळने पाहणी केली असता नागरिकांचा निष्काळजीपणा दिसून आला बहुतेक नागरिकांनी तोंडाला मास्क लावलेला दिसत नव्हता, तर सोशल डिस्टन्सचा संपूर्ण बोपोडी परिसरात फज्जा उडाला आहे. पोलिसांचे बोपोडीकडे दुर्लक्ष झाले आहे. एका रिक्षात दोन प्रवाशां ऐवजी चार ते पाच प्रवासी वाहतूक पोलिसांसमोरच बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. दुचाकीवर तीन जण पोलिसांसमोरून बिनदिक्कतपणे जाताना दिसतात यावर वेळीच बोपोडीत आवर घालणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

Thane: ठाकरे गटाच्या बैठकीत मोठा गोंधळ! शाखेत अचानक ६० ते ७० जणांचा प्रवेश, शाखाप्रमुखांवर जोरदार हल्ला; नेमकं काय घडलं?

Shashikant Shinde Jayant Patil : जयंत पाटील आणि शशिकांत शिंदेंमध्ये दुरावा?, शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं; कोल्हापुरातून पक्षाची बांधणी करणार

"पॉकेटमनीसाठी बाप पाहिजे आदर करण्यासाठी नको" सावत्र भावाचे प्रतीक बब्बरवर आरोप; "आता त्यांना बाबा म्हणत नाही"

SCROLL FOR NEXT