A 47-year-old woman gave life to five people by Organ Donation 
पुणे

Organ Donation 47 वर्षीय महिलेने दिले 5 जणांना जीवदान

सकाळवृत्तसेवा

पुणे : दान केलेल्या अवयवामुळे पाच जणांना जीवदान देण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना मंगळवारी यश आले. त्यात पुण्यातील तीन आणि हैदराबाद येथील दोन रुग्ण आहेत.

हे वाचा - चला भटकायला ; पुण्यातले किल्ले, ऐतिहासिक वास्तू खुल्या 

मेंदूमध्ये रक्तस्राव झालेल्या 47 वर्षीय महिलेला उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, रुग्णाने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचे मेंदूचे कार्य थांबले. त्यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पतीला अवयव दानाबाबत आवाहन केले. या आवाहनाला रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रतिसाद दिल्याने अवयव दान करता आले, अशी माहिती पुण्याच्या झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेश कमिटीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ब्रेन डेड झालेल्या रुग्णाची दोन्ही मूत्रपिंडे, हृदय, यकृत आणि फुफ्फुस दान करण्यात आले. सह्याद्री रुग्णालयातील रुग्णावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. तर, हृदय आणि फुफ्फुस हैदराबाद येथे पाठविण्यात आले. एक मूत्रपिंड पुण्यात तर, दुसरे नाशिकमधील रुग्णांना प्रत्यारोपित केले. त्यामुळे एका महिलेने जगाचा निरोप घेताना पाच जणांना नवीन जीवन दिले, असेही त्यांनी स्पष्ट केले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

Sanjay Manjrekar: रोहित, विराट किंवा बुमराह नाही...'; टीम इंडियाच्या निवडीवर संजय मांजरेकर स्पष्टच बोलले म्हणाले यशस्वी जैस्वालला...

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT