corona
corona 
पुणे

 हवेलीत कोरोनाचा धुमाकूळ सुरूच, सलग दुसऱ्या दिवशी 50 रुग्ण  

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्याच्या विविध भागात कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी धुमाकूळ घालणे सुरूच ठेवले आहे. तालुक्यात शुक्रवारी (ता. ३) सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने पन्नाशीचा आकडा गाठला आहे. त्यामुळे तालुक्यातील अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या दोनशे सत्तरवर झाली आहे. रुग्णांच्या दुप्पट वाढीचा वेग अकरा दिवसांवरून नऊ दिवसांवर आला असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात मांजरी बुद्रुक (१६), नऱ्हे (६), देहू (३), नांदेड (५), न्यू कोपरे (३), खानापूर (१), लोणी काळभोर (४), निरगुडी (१), खडकवासला (४), किरकिटवाडी (१), मांजरी खुर्द (२), वडकी (२) व उरुळी कांचन (२) या तेरा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे 50 रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात सहा रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यात थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील चार जणांचा समावेश आहे. 

हवेली तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात आढळून आलेल्या पन्नास कोरोना रुग्णांपैकी तब्बल पन्नास टक्क्यांहूनही अधिक रुग्ण हे पूर्व हवेलीतील केवळ पाच गावातील आहेत. मांजरी बुद्रुक (सोळा), लोणी काळभोर ( चार), मांजरी खुर्द (दोन), वडकी (दोन) व उरुळी कांचन (दोन) या पाच गावांतच सव्वीस रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पूर्व हवेली सलग चौथ्या दिवशी हॉटस्पॉटवर राहिली आहे. मागिल सात दिवसांचा विचार केल्यास मांजरी बुद्रुक (५४), लोणी काळभोर (१२), कुंजीरवाडी (१०), कदमवाकवस्ती (१३), शेवाळवाडी (१३) व उरुळी कांचन (८) या ग्रामपंचायत हद्दीतील अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या धाकधूक वाढवणारी आहे.

दरम्यान, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस खाते नागरिकांना काळजी घेण्याबाबत वारंवार आवाहन करत आहे. मात्र, तरीही नागरिक आपल्याच धुंदीत वावरत असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT