Vignharta_Blood_Donation_Camp 
पुणे

रुग्णांना रक्त कमी पडू देणार नाही; कार्यकर्त्यांनी घेतली 'श्रीं'चरणी शपथ!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यातच शहरामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हा प्रश्‍न लक्षात घेत पुन्हा एकदा गणेशोत्सव मंडळे रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले. विधायक कार्याला प्रोत्साहन देणाऱ्या 51 गणेशोत्सव मंडळांनी 16 ठिकाणी एकाचवेळी 'विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ' राबविले. त्यामध्ये तब्बल पावणे आठशे कार्यकर्त्यांनी रक्तदान करीत सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ केली. त्याचबरोबर शहरातील रुग्णांना रक्त कमी पडू देणार नसल्याची 'श्री'चरणी शपथ घेतली. 

कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच करण्यावर गणेशोत्सव मंडळांनी भर दिला. मात्र, विधायक कार्याची परंपरा मंडळांनी सुरूच ठेवली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताची कमतरता जाणवू लागल्याने शहरातील 51 गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत रविवारी 'विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ' आयोजित केला होता. वेगवेगळ्या ठिकाणी मात्र एकाचवेळी हे रक्तदान शिबीर संपन्न झाले. बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर शाळेमध्ये सर्व मंडळांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. तेथे त्यांनी शहराला रक्ताची कमी पडू देणार नाही, अशी शपथ घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी रंगावलीच्या माध्यमातून आणि हातात फलक घेऊन रक्तदानाविषयी जनजागृती केली. 

या उपक्रमासाठी पियुष शाह, शिरीष मोहिते, राहुल कामठे, मयूर पोटे, अमित जाधव, अक्षय माळकर, जयेश पंडित, रोहित धावडे, किरण सोनिवाल, उमेश सपकाळ, प्रितम शिंदे, कुणाल पवार, नितीन शेंडगे, अमोल सारंगकर, रावी किरवे , पृथ्वीराज येलवंडे, विशाल धनवडे, हणू शिंदे, चेतन चव्हाण, गोपाल येमुल, सुनील मारणे, सागर माडचेट्टी व हर्षल परदेशी यांनी परिश्रम घेतले. 

श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी, श्री गणेश मित्र मंडळ कोंढवा, युगंधर मित्र मंडळ आनंदनगर, काळ भैरवनाथ, पांगुळ आळी, पोटसुल्या मारुती, नवजवान मंडळ, नवज्योत मित्र मंडळ येरवडा, साईनाथ मंडळ व बालविकास मंडळ बुधवार पेठ, जगोबादादा तालीम मंडळ आदी 51 मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT