56 lakh property cards in the state will now be available online 
पुणे

आनंदाची बातमी : तुमच्या घराची कागदपत्रे आता मिळणार ऑनलाईन !

सकाळवृत्तसेवा

पुणे : बनावट व चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी आता 'ई फेरफार' पाठोपाठ 'ई प्रॉपर्टी कार्ड' (मिळकत पत्रिका) ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे 56 लाख प्रॉपर्टी कार्ड येत्या दोन महिन्यात एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अकोला शहरात बनावट मिळकत पत्रिका तयार करून एक भूखंड बळकविल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यावरून विधानसभेतही गोंधळ झाला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने जमाबंदी आयुक्त एस चोकलिंगम्‌ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात राज्यातील मिळकतपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने ऑनलाइन मिळकतपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश काढले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने यापूर्वी ई-फेरफार हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत दस्तनोंदणी झाल्यानंतर पंधरा दिवसात ऑनलाईनच्या माध्यमातून फेरफार आणि सातबारा उताऱ्यावर नोंदी घालण्यात येतात. त्या पाठोपाठ भूमी अभिलेख विभागाने दोन हजारांवर लोकसंख्या असलेल्या सुमारे चाळीस हजार वाड्या आणि गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी "ई प्रॉपर्टी कार्ड इन्फर्मेशन सिस्टिम' प्रणाली तयार करण्यात आली आहे. तर यापूर्वी महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत प्रॉपर्टी कार्ड देण्यात आली आहे. त्यांची संख्या जवळपास 56 लाख एवढी आहे. पहिल्या टप्प्यात ही सर्व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर टप्याटप्प्याने तयार होणारे प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितली आरोग्यासाठी पंचसूत्री; वाचा सविस्तर

ईप्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन योजनेचे फायदे 
- राज्यातील 56 प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध होणार 
- खरेदी-विक्रीच्या व्यवहार करताना होणारी अचूक माहिती मिळणार 
- खोटे व्यवहार, चुकीच्या नोंदी घालण्यास अटकाव होणार 
- बनावट कागदपत्रे दाखवून होणारे व्यवहार थांबणार 
- दीर्घकाळ प्रॉपर्टी कार्ड जतन करणे शक्‍य होणार 
- मालकी हक्काचा कायदेशीर पुरवा होणा
र 


''प्रॉपर्टी कार्ड देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड असलेल्या मिळकतीचे व्यवहार करताना त्यामध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे.''
- बाबासाहेब काळे (उपजिल्हाधिकारी- भूमी अभिलेख विभाग) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT