Remdesivir Google
पुणे

पुणे जिल्ह्यासाठी ५,९०० रेमडेसिव्हिर

पुणे जिल्हा प्रशासनाकडून कोविड रुग्णालयांसाठी पाच हजार ९०० इंजेक्शनचा साठा सोमवारी उपलब्ध करून देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा प्रशासनाकडून कोविड रुग्णालयांसाठी पाच हजार ९०० इंजेक्शनचा साठा सोमवारी उपलब्ध करून देण्यात आला. रुग्णालयातील ऑक्सिजनयुक्त आणि आयसीयूमधील एकूण खाटांच्या क्षमतेच्या तुलनेत ४० ते ७० टक्के प्रमाणात रेमडेसिव्हिर वितरित केले आहे, त्यामुळे ‘रेमडेसिव्हिरसाठी धावाधाव करणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील एकूण ५११ कोविड रुग्णालयांना हा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रुग्णालयांमध्ये १२ हजार १३१ खाटांची क्षमता आहे. आज पहिल्या टप्प्यात १८४ कोविड रुग्णालयांना पहिल्यांदाच रेमडेसिव्हिर देण्यात आले. त्यांना खाटांच्या क्षमतेच्या तुलनेत ७० टक्के रेमडेसिव्हिर देण्यात आले. तर, उर्वरित ३२७ कोविड रुग्णालयांना खाटांच्या तुलनेत ४० टक्के रेमडेसिव्हिर देण्यात आले. सोमवारी पुणे महापालिका हद्दीतील आणखी १४ कोविड रुग्णालयांचा समावेश झाला आहे. त्यांनाही मंगळवारी रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या या इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप सुरू केले आहे.

कोविड रुग्णालयांनी त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या संख्येनुसार सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार प्राप्त करून घ्यावेत. याबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी रुग्णालय प्रशासन आणि घाऊक विक्रेत्यांनी घ्यावी. कोविड रुग्णालयांनी रेमडेसिव्हिर घेण्यासाठी रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही, प्राधिकार पत्र आणि प्राधिकृत व्यक्तीचे छायाचित्र हे ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्याची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील सोमवारची स्थिती -

  • कोविड रुग्णालये : ५११

  • खाटांची क्षमता (ऑक्सिजनयुक्त व आयसीयू) : १२ हजार १३१

  • रेमडेसिव्हिर उपलब्ध : ५ हजार ९००

कोविड रुग्णालय नसलेल्या रुग्णालयांनाही रेमडेसिव्हिरची गरज असल्यास त्यांनी संबंधित महापालिका, तालुका किंवा जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून केवळ कोविड रुग्णालय म्हणून नोंद करीत असल्याचे पत्र घ्यावे.

- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT