balewadi1 
पुणे

पुणे : बालेवाडी केंद्रातील `एवढे` जण जिंकले कोरोना विरूध्दची लढाई

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी : शहरातील कोरोना बाधित रुग्णांना बालेवाडीतील निकमार महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे. सध्या याठिकाणी एकूण २२० बाधित रुग्ण असुन, यांपैकी सहा जणांनी कोरोना विरोधी लढाई जिंकली. त्यांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात घरी सोडण्यात आले. 

सहापैकी पाच रुग्ण हे पर्वती दर्शन येथील आहेत, तर एक रुग्ण पाटील इस्टेट येथील रहिवासी आहे. यावेळी डॉ. जयंत कांबळे, इंद्रजीत रणदिवे, बाणेर-औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सह-आयुक्त जयदीप पवार, डॉ. मीनल पाचुंदे, डॉ. श्रीकांत शिंदे, जालिंदर चांदगुडे, नितीन लोखंडे, निखिल निकम आदी उपस्थित होते. 

या वेळी महापालिका प्रशासन, डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेबद्दल कोरोना मुक्तांनी आभार मानले. तसेच डॉ. कांबळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. दरम्यान, यावेळी कोरोना बाधित असणाऱ्या रुग्णांमध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणे दिसत नसताना या रुग्णांच्या टेस्ट पॉझिटीव्ह आल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पूरस्थिती गंभीर; भारतीयांसाठी 24×7 हेल्पलाइन जारी, हे नंबर सेव्ह करा!

True Friendship: संकटात रक्ताची नाती दुरावली, पण मित्र धावून आले; सचिनच्या कुटुंबासाठी जमवले ६ लाख ७२ हजार, रक्ताच्या नात्यालाही लाजवेल अशी मैत्री

४३ वर्षांनंतर ‘मासूम’ची नवी कहाणी; ए. आर. रहमान यांनी रेकॉर्ड केली 3 गाणी

Ichalkaranji Child Death : दूध पिताना चिमुकल्याला ठसका लागून श्वास कोंडला अन्..., इचलकरंजीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

Marathi News Live Updates : AIच्या वापराने शेतीतील उत्पादन खर्च २५ ते ३० टक्के कमी करू शकतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT