Corona patients Sakal
पुणे

पुणे शहर व जिल्ह्यात मंगळवारी ६ हजार ११० नवे कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता. ११) ३२ हजार ६७२ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता. ११) ३२ हजार ६७२ झाली आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या मंगळवारी (Tuesday) (ता. ११) ३२ हजार ६७२ झाली आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी १ हजार ५०४ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार (Treatment) सुरु असून उर्वरित ३१ हजार १६८ गृहविलगीकरणात आहेत. यामध्ये शहरातील १९ हजार ४५२ सक्रिय कोरोना रुग्णांचा समावेश आहे. मात्र सक्रिय रुग्ण वाढत असले तरी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने पुणेकरांनी घाबरून जाऊ नये. परंतु प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्‍यक असल्याचे मत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

शहर व जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ६ हजार ११० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांत पुणे शहरातील ३ हजार ४५९ रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ७०६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ७११, नगरपालिका हद्दीत १२१, कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ११३ नवे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, पुणे शहरातील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

याउलट, दिवसभरात १ हजार ६३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसातील एकूण कोरोनामुक्तात १ हजार १०४ रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमधील ३८७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ९१, नगरपालिका हद्दीतील ३७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १९ जण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT