School
School 
पुणे

पुणेकरांनो, शाळा पुन्हा सुरू करण्याची 70 टक्के तयारी पूर्ण!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता नव्या वर्षात (म्हणजेच जानेवारी 2021) शहरातील शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जवळपास 70 ते 80 टक्के तयारी पूर्ण झाली आहे. आता केवळ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पुन्हा कोरोना चाचणी आणि शाळेचे निर्जंतुकीकरण एवढेच काय ते काम बाकी आहे. आता शाळेची घंटा 4 जानेवारीला प्रत्यक्ष वाजण्याची प्रतीक्षा लागली आहे, अशीच भावना शिक्षक वर्गातून व्यक्त होत असून शिक्षक विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी शिक्षकांना भेटण्यास प्रचंड उत्सुक असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग 4 जानेवारीपासून सुरू करण्याला नुकतीच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील शाळांमधील तयारीचा प्रातिनिधिक स्वरूपात आढावा घेतला असता, शाळा पुन्हा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते. राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले, त्यावेळीच सर्व शाळा व्यवस्थापनाने शाळा पुन्हा सुरू करण्याची तयारी केली होती. परंतु दरम्यान 13 डिसेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रातील शाळा बंद राहतील, असा निर्णय महापालिकेने जाहीर केला.

त्यानंतर 14 डिसेंबरला शाळा सुरू होतील, या आशेने शाळांनी यापूर्वी केलेल्या तयारीचा पुन्हा आढावा घेतला. मात्र, पुन्हा महापालिकेने 3 जानेवारीपर्यंत शाळा बंद राहतील, असा आदेश काढला. त्यानंतर गुरूवारी महापालिकेने 4 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याला मान्यता दिली आणि शाळांनी यापुर्वी केलेल्या तयारीचा पुन्हा आढावा घेण्यास सुरवात केली. यापुर्वी कोरोना चाचणी केली असली, तरीही शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता पुन्हा चाचणी करावी लागणार आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी, शाळेचे निर्जंतुकीकरण आणि पालकांचे संमती पत्र मिळविणे, ही कामे पुन्हा नव्याने करावी लागणार असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

"विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर, थर्मोमीटर, ऑक्‍सिमीटर अशी आवश्‍यक उपकरणे यापूर्वी शाळेत संकलित केली आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात कसे बसवायचे, अभ्यासक्रमाचे वेळापत्रक कसे असेल, विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत बोलवत असतानाच उर्वरित विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तासिका, याबाबत नियोजन यापुर्वीच झाले आहे. त्यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याची 70 टक्के तयारी पुर्ण आहे. आता केवळ शाळेचे निर्जंतुकीकरण, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आणि पालकांचे संमतीपत्र ही तयारी पुन्हा करावी लागणार आहे.
- जालिंदर भागवत, मुख्याध्यापक, गेनबा सोपानराव मोझे प्रशाला (माध्यमिक विभाग)

"शाळा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने 70 ते 80 टक्के तयारी यापूर्वीच झालेली आहे. यात विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था, अभ्यासक्रमाचे वेळापत्रक, सॅनिटायझरची सोय उपलब्ध करून देणे, आवश्‍यक वस्तू आणि उपकरणांचा साठा करणे या तयारीचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत शिक्षकांची बैठक घेतली जाईल. तसेच शिक्षकांमार्फत प्रत्येक वर्गातील पालकांची ऑनलाईन बैठक होईल. त्यावेळी पालकांना शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना दिल्या जातील. पालकांचे संमती पत्र पुन्हा घ्यावे लागणार आहे.''
- संजीवनी ओमासे, मुख्याध्यापिका, नूतन मराठी विद्यालय (मुलांचे)

शाळांची ही तयारी पूर्ण :
- विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था
- सॅनिटायझर, थर्मामीटर, ऑक्‍सीमीटर अशा उपकरणाचे संकलन
- प्रत्येक वर्गात काय-काय आणि कसे शिकवायचे याचे वेळापत्रक 
- ऑफलाईन आणि ऑनलाईन वर्ग एकाच वेळी सुरू ठेवण्याचे नियोजन
- आरोग्याच्या सुरक्षितेबाबत संदेश फलक 

शाळांना हे पुन्हा करावे लागणार :
- संपुर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण
- शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
- पालकांचे संमती पत्र मिळविणे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT