Corona Patient
Corona Patient Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात बुधवारी ७११ नवे कोरोना रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.१६) दिवसभरात ७११ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट २ हजार १०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) बुधवारी (ता.१६) दिवसभरात ७११ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. याउलट २ हजार १०१ जण कोरोनामुक्त (Coronafree) झाले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात केवळ एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे. हा एक मृत्यू नगरपालिका हद्दीतील आहे. बुधवारी पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३६१ रुग्ण आहेत. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये १६१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १४८, नगरपालिका हद्दीत १९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २२ नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार १६५ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ४५७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र ३७७, नगरपालिका हद्दीत ८५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण ६ हजार ७२२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी पुणे शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून ७७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित ५ हजार ९५२ जण गृह विलगीकरणात आहेत. बुधवारी दिवसभरात १२ हजार ४५० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT