Fund Sakal
पुणे

माजी सैनिकांना ७४ कोटींचे अर्थसाहाय्य

राज्यातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालये आणि सैनिक कल्याण विभागाने विशेष प्रयत्न केले. त्यामुळे राज्यातील विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या ३० हजार ८२५ माजी सैनिकांना हे आर्थिक साहाय्य प्राप्त झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालये आणि सैनिक कल्याण विभागाने विशेष प्रयत्न केले. त्यामुळे राज्यातील विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या ३० हजार ८२५ माजी सैनिकांना हे आर्थिक साहाय्य प्राप्त झाले आहे.

पुणे - संरक्षण मंत्री कल्याण निधीतून (Fund) केंद्रीय सैनिक बोर्डाला ३२० कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातून बोर्डाने राज्यातील माजी सैनिकांच्या (ex-servicemen) कल्याणाच्या योजनांसाठी ७३ कोटी ६८ लाख रुपयांचे भरघोस अर्थसाहाय्य (Finance) केले आहे. माजी सैनिकांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्रीय सैनिक बोर्डाकडून आर्थिक मदत मिळण्याची पहिलीच वेळ आहे.

राज्यातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालये आणि सैनिक कल्याण विभागाने विशेष प्रयत्न केले. त्यामुळे राज्यातील विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या ३० हजार ८२५ माजी सैनिकांना हे आर्थिक साहाय्य प्राप्त झाले आहे. या आर्थिक मदतीमध्ये शहीद आणि दिव्यांग सैनिकांच्या पाल्यांनाही आर्थिक मदत मिळाली आहे. त्यांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्तीही मिळते. सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पुढील वर्षीही माजी सैनिकांनी आर्थिक मदतीसाठी जास्तीत जास्त अर्ज केंद्रीय सैनिक मंडळाकडे पाठवावेत, असे आवाहन सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल रा. रा. जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.

माजी सैनिकांसाठीच्या योजना, प्राप्त अर्ज आणि कंसात अर्थसाहाय्य (रुपयांत)

  • पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना २ हजार १२ (५ कोटी ७९ लाख ५१ हजार)

  • एज्युकेशन ग्रँट (पहिली ते पदवीपर्यंत शिक्षणासाठी) २६ हजार ५४८ (५७ कोटी ६४ लाख ४४ हजार)

  • १०० टक्के दिव्यांग पाल्यांना आर्थिक मदत ८९ (१० लाख ६८ हजार)

  • मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत ७६५ (३ कोटी ८२ लाख ५० हजार)

  • वैद्यकीय आर्थिक मदत १ (१ लाख २५ हजार रुपये)

  • पेन्शन नसणाऱ्या माजी सैनिकांसाठी १ हजार ३०७ (६ कोटी २७ लाख ३६ हजार)

  • युद्ध विधवांसाठी गृहकर्जावर अनुदान २ (२ लाख)

  • अपंग माजी सैनिकांना स्कूटरसाठी १ (५७ हजार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Ajit Pawar Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राजेश टोपेंनी दोन वाक्यात विषय संपवला, Video

February Tarot Horoscope: फेब्रुवारीत बदलणार भाग्य! लक्ष्मी नारायण राजयोगामुळे 12 राशींमधील कोणत्या राशींना मिळणार श्रीमंती? वाचा मासिक टॅरो राशीभविष्य

Horoscope : शनिची साढेसाती अन् राहु प्रकोपातून 'या' राशींची होणार सुटका; 3 फेब्रुवारीनंतर धनलाभ, जुनी समस्या संपणार, पूर्ण होईल मोठं काम

Senior Travel Insurance : निवृत्तीनंतर निश्चिंत प्रवासासाठी प्रवास विमा का गरजेचा? तज्ज्ञ सांगतात महत्त्वाच्या गोष्टी

Indigo Flight Bomb Threat: कुवेत–दिल्ली इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी; अहमदाबादमध्ये तातडीचे लँडिंग

SCROLL FOR NEXT