covishild  
पुणे

पुण्यात 75 केंद्रांवर लसीकरण; कोव्हिशिल्डचे 7500 डोस

पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी घेणाऱ्यांना आज दुसरा डोस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने महापालिकेला कोव्हिशिल्ड लसीचे साडेसात हजार डोस दिले आहेत. त्यानुसार उद्या (बुधवारी) महापालिकेचे दवाखाने, प्रसूतिगृह, ओपीडी अशा ७३ ठिकाणी ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना कोव्हिशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांनाच दुसरा डोस मिळणार आहे.(7500 doses of Covishield Vaccination at 75 centers in Pune today)

शहरात दोन दिवसांपासून लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. परंतु, मंगळवारी साडेसात हजार डोस उपलब्ध झाल्याने लसीकरण सुरू करता येणार आहे. महापालिकेच्या शाळा, विरंगुळा केंद्र या ठिकाणांवर लस न देता ती केवळ पालिकेची दवाखाने, ओपीडी आणि प्रसूतिगृह अशा ६३ केंद्रांसह महत्त्वाच्या ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्राला १०० डोस पुरविले आहेत. इतर गटातील नागरिकांनी व पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग केले नाही, अशांनी लसीकरण केंद्रावर जाऊ नये, असा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.

नियम बदलानंतर प्रथमच लसीकरण

केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्याबाबत नवे आदेश काढले आहेत. त्यामध्ये दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान घ्यावा, असे नमूद केले आहे. मात्र, हा आदेश ज्या दिवशी काढला त्या दिवसापासून शहरात कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झालेली नव्हती. आता लस उपलब्ध झाल्याने ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस मिळणार आहे.

कोणाला मिळणार लस?

  1. ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला, अशांनाच बुधवारी दुसरा डोस देणार.

  2. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी व ४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी ९० टक्के लस.

  3. केवळ ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी १० टक्के लस राखीव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain : साताऱ्यात अतिवृष्टीचा तडाखा! जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले, हवामान विभागाचा काय इशारा..

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रवास सुखकर होण्यासाठी यंत्रणा सज्ज

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

SCROLL FOR NEXT