mpsc.jpg 
पुणे

'एमपीएससी'ने जाहीर केला 'या' परिक्षेचा निकाल

सकाळवृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्व परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये ७६० उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एमपीएससीतर्फे दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गातील ७४ पदासाठी १ मार्च रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. या परीक्षेतून एकूण 760 उमेदवार मुख्य परीक्षा देणार आहेत. मुख्य परीक्षेसाठी मुदतीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस प्रवेश दिला जाणार आहे. अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांना आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील माहितीच मुख्य परीक्षेसाठी स्वीकारार्ह आहेत. उमेदवारांने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आश्‍यक आहे. त्यासाठी परीक्षा केंद्र निश्‍चित करावे लागेल. त्यानंतर शुल्क भरणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT