coronavirus 
पुणे

पुणे जिल्ह्यात आज 761 नवे कोरोना रुग्ण; 781 कोरोनामुक्त

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.12) दिवसभरात 761 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट 781 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील 347 जण आहेत. दिवसभरात 9 हजार 169 कोरोना चाचण्या घेण्यात आहेत. गेल्या 24 तासांत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच चिंचवडमध्ये 180, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 201, नगरपालिका कार्यक्षेत्रात 51 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सहा आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार जणांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महापालिका, नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयांत मिळून 3 हजार 160 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 6 हजार 220 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 33 हजार 759 जणांना कोरोना होऊन गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 415 रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.11) रात्री आठ वाजल्यापासून आज (ता.12) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील 254 जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील 267, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 226, नगरपालिका कार्यक्षेत्रातील 20 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सव्वासतरा लाख कोरोना चाचण्या
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 17 लाख 36 हजार 762 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 8 लाख 60 हजार 366 चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाच लाख 9 हजार 786, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 2 लाख 69 हजार 189, नगरपालिका क्षेत्रात 76 हजार 641 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 20 हजार 780 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT