Pune Accident News sakal
पुणे

Pune Accident News : कार व कंटेनरची समोरासमोर धडक ; चार गंभीर जखमी

बकोरी - थेऊर या अष्टविनायक महामार्गावरची घटना....बकोरी - थेऊर या अष्टविनायक महामार्गावर जोगेश्वरी मंदीरा समोर कंटेनर व कार मध्ये समोरासमोर धडक झाली. या धडकेत सात जण जखमी झाले. यातील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : बकोरी - थेऊर या अष्टविनायक महामार्गावर जोगेश्वरी मंदीरा समोर कंटेनर व कार मध्ये समोरासमोर धडक झाली. या धडकेत सात जण जखमी झाले. यातील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला. हा अपघात रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारचा चक्काचुर झाला. कार मध्ये सात जण होते. त्यातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. गणेश जाधव, विनोद भोजणे, विठ्ठल जोगदंड, हेमंत देसाई अशी रुग्णालयात दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांना वाघोली व खराडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कार चालक अडकून पडला होता.

पोलीस व नागरिकांनी त्याला काढून रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सीमा ढाकणे कर्मचाऱ्यांसहीत अपघात स्थळी पोहचल्या. नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. लोणीकंद पोलीस व लोणी वाहतूक विभागाने दोन्ही वाहने बाजूला करून कोंडी दूर केली. जोगेश्वरी मंदिरा समोर वळण आहे. वनविभागाने तेथे संरक्षक जाळी बसविल्याने वळण तीव्र झाले आहे. यामुळे तेथे नेहमी अपघात होत असल्याचे तेथील रहिवासी व माहिती अधिकारी कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT