पुणे

Video : कोंढव्यात गोडाऊनला लागलेली भीषण आग नियंत्रणात

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

निनाद कुलकर्णी

पुणे : शहरातील कोंढवा कोंढवा बुद्रुक येथील पारगे नगर येथील फर्निचरच्या गोडाऊनला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. (Huge Fire Broke Out At Kondhwa Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा भागात मोठ्या प्रमाणात सोफ्याचे तसेच इतर लाकडी फर्निचरचे गोडाऊन आहे. त्यातील एका गोदामाला दुपारच्या सुमारास आग लागली. गोदामात लाकडी साहित्य आणि सोफ्यासारखे साहित्य असल्याने आगीेने काहीवेळातच रौद्ररुप धारण केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यानंतर जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. गोदामात लाकडी साहित्य आणि फोममुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच अडचणींचा सामना करावा लागला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT