पुणे

दीडशे फूट खोल दरीत कोसळला पण तरी बचावला

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर : मध्यरात्रीच्या वेळेस, नवीन खेड घाटातून मोटार दगडधोंड्यांवर आपटत दीडशे फूट खोल दरीत पडली तरी प्रवासी चालकाचा जीव वाचल्याची किमया सोमवारी रात्री घडली. वेळ आली होती पण काळ नव्हता या म्हणीचा प्रत्यय आला होता. पोलीस व कार्यकर्ते वेळेत पोहचल्याने त्याचे प्राण वाचले.

सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास, पुणे नाशिक महामार्गावरून एक फियाट कंपनीची मोटार (क्र. एम एच १५ एफ एन १५७३) नाशिककडून पुण्याकडे चालली होती. संजय मधुकर खैरनार ( वय ४९, रा. नाशिकरोड, नाशिक ) हे स्वतः गाडी चालवत होते. ते पुण्यातील आपल्या साडूंकडे चालले होते. नवीन खेड घाटातून मोटार जात असताना नादुरुस्त वाटत होती, म्हणून त्यांनी ती एका बाजूला घेतली आणि गिअर - अॅक्सेलेटर तपासत होते. तेवढ्यात अचानक त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी डाव्या बाजूच्या दरीत सुमारे दीडशे फूट खोल पडली. नुकतेच घाटाचे काम झालेले असल्याने मोठ्या दगड-गोट्यांचा भराव केलेला आहे. त्यांवरून आपटत आणि नंतर झाडाझुडुपांवर आदळत गाडी खाली जाऊन एका ठिकाणी अडकली.

कुणीतरी भल्या माणसाने ताबडतोब खेड पोलिसांना फोन केला. सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस स्वप्नील गाढवे, संतोष घोलप, शेखर भोईर,अर्जुन गोडसे, होमगार्ड गुलाब लोखंडे, बाळा भांबुरे आदी पोलीस व होमगार्ड काही तरूणांसह तेथे तात्काळ पोहचले. ते खाली उतरून मोटारीजवळ पोहचले. त्यांनी काचा फोडून खैरनार यांना बाहेर काढले. खैरनार मागच्या व पुढच्या सीटांमध्ये अडकलेले होते. ते जवळपास बेशुद्ध होते, पण कुठलीही मोठी जखम, रक्तस्राव दिसत नव्हता. सर्वांनी आळीपाळीने मिळून उचलून त्यांना वरती रस्त्यावर आणले आणि रुग्णवाहिकेतून लगेच सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते ठीक असून गंभीर जखमी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेळीच पोलिसांना लगेच समजल्याने आणि लवकर मदत पोहचविल्याने खैरनार त्यांचे प्राण वाचले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी भावना यावेळी मदत करणाऱ्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE: पुण्यात सलग तीन दिवस १० अंशांखाली तापमान

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT