Pune News sakal
पुणे

Pune News : पानशेत नदीपात्रात गोधड्या धुण्यासाठी गेलेल्या पुण्यातील मजूर तरुणाचा बुडून मृत्यू

पानशेत धरण (ता.राजगड) येथील नदीपात्रात बहिण भावांसह गोधड्या धुण्यासाठी गेलेल्या पुण्यातील मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवार (ता.२८) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून अनिल लहू चव्हाण (वय.३०) वर्ष राहणार भीमदीप झोपडपट्टी,बिबवेवाडी,पुणे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत वडील लहू भिकू चव्हाण( वय. ६४) यांनी पानशेत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असल्याची माहिती पोलीस हवालदार पी.एन .मोघे यांनी दिली.

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे,(पुणे) : पानशेत धरण (ता.राजगड) येथील नदीपात्रात बहिण भावांसह गोधड्या धुण्यासाठी गेलेल्या पुण्यातील मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवार (ता.२८) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून अनिल लहू चव्हाण (वय.३०) वर्ष राहणार भीमदीप झोपडपट्टी,बिबवेवाडी,पुणे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत वडील लहू भिकू चव्हाण( वय. ६४) यांनी पानशेत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असल्याची माहिती पोलीस हवालदार पी.एन .मोघे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस म्हणाले, खामगाव (ता. राजगड) व खानापूर (ता.हवेली ) या ठिकाणी चव्हाण कुटुंबीय मजुरीचे काम करण्यासाठी आले होते .दरम्यान आज सकाळी मृत अनिल चव्हाण हा त्याच्या भावांसोबत व सावत्र बहिणीं बरोबर पानशेत गावच्या पुढे गेल्यानंतर डावीकडे पानशेत बोटिंग क्लब कडे वळताना असलेल्या कॅनॉलच्या कॉर्नर नदीपात्रात गोधडी धुण्यासाठी गेला होता. दरम्यान धरणाच्या नदीपात्रात पडल्याने व मिळालेल्या माहितीनुसार अनिल याला पोहता येत नसल्याने बुडाला गेला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार पी.एन .मोघे ,युवराज सोमवंशी यांनी रेस्क्यू टीमशी संपर्क केला दरम्यान

पाण्यामध्ये शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन माय सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ ,धनंजय सपकाळ ,गुलाब भोंडेकर, संदीप सोलस्कर ,संजय चोरगे, विजय जावळकर ,गणेश जाधव यांच्या टीमने नदीपात्रात उतरून शोध घेण्यास सुरुवात केली नदीपात्रात दोरखंडाचे साहाय्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणी वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षण नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल पी .एन .मोघे अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

Pune Crime: दूध भेसळप्रकरणी पोलिसांचा धडाका; आणखी १० आरोपी अटकेत, एकूण २४ जणांना बेड्या

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद अन् थेट हल्ला; मारहाणीत ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू, कोलदऱ्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट

'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT