Pune Accident News sakal
पुणे

Pune Accident News : ट्रक व बुलेटच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यु

लोणीकंद - थेऊररोड वर पुन्हा अपघात... लोणीकंद थेऊर रोड वर मगर वस्ती परिसरात ट्रकची धडक बसल्याने बुलेट वरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसात तीन अपघातात पाच जणांचा बळी गेला.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : लोणीकंद थेऊर रोड वर मगर वस्ती परिसरात ट्रकची धडक बसल्याने बुलेट वरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसात तीन अपघातात पाच जणांचा बळी गेला. यातील दोन अपघात लोणीकंद थेऊर या अष्टविनायक रोड वर घडले.

  रोहित काळुराम वारघडे (वय २५ वर्षे, रा बकोरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रय आनंदा वारघडे यांनी फिर्याद दिली. ट्रक चालक रंगनाथ रावसाहेब शिरसाट ( वय ४९, रा बीड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा वाघोली येथून बकोरी कडे बुलेट वर जात होता. ट्रकचा बुलेटला धक्का लागल्याने बुलेट घसरून रोहित हा

ट्रकच्या चाकाखाली आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याच रोड वर २८ एप्रिलला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास इको कार व कंटेनर यांची समोरासमोर धडक होवून गणेश जाधव, विनोद भोजणे व विठ्ठल जोगदंड, या तीन जणांचा मृत्यू झाला.

तर २९ एप्रिल रोजी पुणे नगर महामार्गावर हॉटेल कावेरी समोर लोखंडी सळ्या घेवून थांबलेल्या ट्रकला कारची पाठीमागून धडक बसल्याने कार चालक तरुण विजय अभिमन्यू तांदळे याचा मृत्यू झाला. हा अपघात पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. अनेक वाहने वाहतूक नियमांचे दुर्लक्ष करून वाहतूक करतात. त्यांचा वेग अती असतो. अनेक वाहने जुनी आहेत. मात्र बेदारकपणे ते वाहतूक करतात. यामुळेच अपघात होवून बळी जातात. मात्र त्याची जाण संबंधित सरकारी यंत्रणेला अजीबात नाही. असा नागरिकांचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT