crime Sakal Media
पुणे

पुणे : नऱ्हे गावात तरुणावर कोयत्याने वार

दहा ते बारा जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून वार केल्याची घटना

विठ्ठल तांबे

धायरी : सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धायरी येथील जाधवनगर येथे दोन आठवड्यापूर्वी घडलेली खुनाची घटना ताजी असताना काल पुन्हा दुसरी घटना नऱ्हे गावातील झील कॉलेज चौकातील रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी पूर्ववैमनस्यातून सुमित वैराट या तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. यातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. तर बाकी आरोपीचा शोध सुरू आहे. अंगावर वार होत असताना जवळच्या इमारतीत असणाऱ्या एका व्यक्तीने जखमी अवस्थेत सुमितला घरात घेऊन दरवाजा लावल्याने त्याचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे.

घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. गंभीर जखमी सुमित याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलिस उपनिरीक्षक नितीन जाधव, कुलदीप संकपाळ या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फूटेज प्राप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतले तर इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT