पुणे

आषाढी वारीसाठी देहूत तयारी

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा एक जुलै रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

देहू - आषाढी वारीसाठी (Aashadhi Wari) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा (Sant Tukaram maharaj Palkhi Sohala) एक जुलै रोजी देहूतून (Dehu) पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याची तयारी संत तुकाराम महाराज संस्थान केली आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात पालखी प्रस्थान सप्ताह सुरू झाला आहे. यंदा आषाढी वारी सरकारच्या वतीने विशेष वाहनाने पंढरपूरला जाणार आहे. (Aashadhi Wari Preparation in Dehu)

प्रस्थान कार्यक्रम (ता. १)

  • पहाटे पाच ते सहा महापूजा

  • सकाळी ९ ते १२ देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन

  • दुपारी दोन वाजता ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचे प्रस्थान

  • प्रस्थान सोहळ्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुख्य मंदिरात राहतील

प्रस्थाननंतरचे देहूतील नित्यनेम (ता. १ ते १८ जुलै)

  • पादुका १८ जुलैपर्यत देऊळवाड्यात मुख्य मंदिरात राहतील

  • पहाटे चार ते सहा सर्व देवतांची नित्यपूजा

  • सकाळी सहा ते संध्याकाळी ६ सहापर्यंत सोहळा वाटचालीचे कार्यक्रम

  • सायंकाळी ६ वाजता समाज आरती, रात्री ९ ते अकरा कीर्तन सेवा

आषाढी वारी (१९ जुलै ते ४ ऑगस्ट)

  • पादुका सकाळी ९ वाजता एसटी बसने पंढरपूरकडे जाणार

  • १९ ते २४ जुलैपर्यत पादुका पंढरपूरमध्ये राहतील

  • २४ जुलैला पंढरपूरहून देहूकडे एसटी बसने परतीचा प्रवास

  • २४ जुलै ते ४ ऑगस्टपर्यत पालखी सोहळा देऊळवाड्यात राहील

संस्थानने पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यासाठी वेगवेगळ्या दिंडीतील शंभर वारकऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. तसेच त्यांना कोरोनाची चाचणी करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. पालखी रथाची डागडुजी केली आहे.

- संजय महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख,संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT