corona1
corona1 
पुणे

दौंडमधील 60 टक्के रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या ५४३ नागरिकांपैकी तब्बल ५९.४९ टक्के बाधित नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. तर, २०४ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये दौंड शहरातील १११, ग्रामीण भागातील ८९ व राज्य राखीव पोलिस दलाच्या ४ पोलिस यांचा समावेश आहे.

दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते ३० जुलै या ९३ दिवसांच्या कालावधीत एकूण ५४३ जणांना कोरोनाची बाधा झाली व त्यापैकी ३२३ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. एप्रिल महिन्यात फक्त १, तर मे महिन्यात ५० जणांना बाधा झाली होती. परंतु, त्यानंतर बाधितांची संख्या सातत्याने वाढत ५४३ पर्यंत पोचली आहे. दौंड शहरातील १२ आणि ग्रामीण भागातील पाटस, पिलाणवाडी, लिंगाळी व बोरीएेंदी येथील चार, असे एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात २९ एप्रिल ते ३० जुलै या कालावधीत दहिटणे, कुरकुंभ, खुटबाव, लिंगाळी, केडगाव, बोरीपार्धी, वरवंड, मलठण, पाटस, केडगाव स्टेशन, यवत, पारगाव, भरतगाव, सोनवडी, पानवली, राहू, खोर, पिलाणवाडी, गोपाळवाडी, मळद, भांडगाव, वाखारी, खुटबाव, कासुर्डी, सहजपूर, खामगाव, जावजीबुवाची वाडी, बोरीभडक, देलवडी, आलेगाव, वाटलूज, राजेगाव, नांदूर, मिरवडी, बोरीबेल, उंडवडी, कानगाव, ताम्हाणवाडी, नानगाव, हातवळण, आदी गावांमध्ये एकूण २३७ जणांना बाधा झाली आहे. त्यापैकी तब्बल १४४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. दौंड शहरात १ मे ते ३० जुलै या कालावधीत २३८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहराच्या बहुतांश सर्व भागात बाधित रूग्ण आढळले असून, उपचारानंतर त्यापैकी तब्बल ११५ जण बरे झाले आहेत. 

विलगीकरणामुळे ६८ पैकी ६४ पोलिस बरे 
दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातचे ४९, गट क्रमांक पाचचे ४, इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) १५, असे एकूण ६८ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना बाधा झाली होती. मुंबईच्या विविध भागात बंदोबस्त करून परतलेल्या पहिल्या तुकडीचे दौंड शहरात व त्यानंतरच्या तुकड्यांना दौंड शहरात न आणता नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आल्याने प्रादुर्भाव रोखण्यात यश आले. राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या मुंबई येथील राजभवन येथे बंदोबस्त करून परतलेल्या आयआरबी तुकडीला देखील थेट दौंड शहरात न आणता दौंड- पाटस रस्त्यावरील एका शिक्षण संस्थेत विलगीकरण करण्यात आले होते. ६८ बाधितांपैकी ६४ पोलिस बरे झाले असून, ४ जणांवर उपचार सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: केएल राहुलला डच्चू, तर हार्दिक उपकर्णधार; वर्ल्ड कपसाठी कसं भारतीय संघात कसं आहे खेळाडूंचं संमिश्रण

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

Dombivli News : डोंबिवलीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन; उमेदवार वैशाली दरेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Kiran Mane: उज्ज्वल निकम अन् एस.एम. मुश्रीफांच्या पुस्तकातले सिक्रेट्स; मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत किरण मानेंनी शेअर केली पोस्ट

Rajan Patil : मोहोळ तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला ज्यादा मताधिक्य देण्याचा निर्धार - राजन पाटील

SCROLL FOR NEXT