chakan
chakan 
पुणे

परप्रांतीयांचे आकडे तुमचे मन विचलित करू शकतात... 

हरिदास कड

चाकण (पुणे) : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाच्या भीतीने खेड तालुक्‍यातील चाकण एमआयडीसी परिसरातील सुमारे एक लाख जणांनी परप्रांतीयांनी परत आपल्या घरी जाण्यासाठी वैद्यकीय तपासणी करून फिटनेस सर्टिफिकेट घेतले आहे, अशी माहिती खेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळिराम गाढवे यांनी दिली. 

काही परप्रांतीय पायी जात आहेत; तर सरकारच्या वतीने एसटी बस सोडण्यात येत आहेत. चाकण येथून आज साठ एसटी बस सोडण्यात येत आहे. त्यातून दोन हजार परप्रांतीय कामगार व मजूर मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात जाणार आहेत. सुमारे साठ हजार कामगार व मजुरांनी परराज्यात जाण्यासाठी पोलिसांकडे नोंद केली आहे, अशी माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली. 

चाकण परिसरात घरी जाणाऱ्या परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. प्रत्येक बसमध्ये तीस जण बसविण्यात येत आहे. पोलिसांच्या वतीने कामगार व मजूर यांची यादी बनविली जात आहे. त्यानंतर त्यांना बसमध्ये बसविण्यात येत आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवार, मंडलाधिकारी दीपक मडके, तलाठी श्‍याम वाल्हेकर, श्रीधर आचारी, एसटी महामंडळाचे अधिकारी व चालक, कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. मजूर कामगारांसाठी जेवण व पाणी आदी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, बहुतांश कामगार व मजूर परवानगी मिळवून रेल्वेने व बसने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. काही पायीच गावी गेले आहेत; तर काही अजूनही चालत आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा   

कंपन्या व इतर कामे सुरू झाल्यावर कामगार व मजूर टंचाईचा मोठा फटका कंपन्यांना व इतरांना बसणार, हे मात्र नक्की आहे. कोणी मजूर व कामगार देता का, अशी वेळ कंपन्यांवर व इतर व्यावसायिकांवर येण्याची अधिक शक्‍यता वर्तविली जात आहे. 
   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT