police
police 
पुणे

फरारी आरोपींचा  पोलिस ठाण्यातच मुक्त वावर! 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरातील वातानुकूलित जुगार अड्ड्यावरील छाप्यातील अड्डामालकासह दोन आरोपी कागदोपत्री फरारी आहेत. त्यांना दौंड पोलिसांची कसल्याही प्रकारची भीती नसल्याचे आज दिसले. कारण, ते फरारी आरोपी आज दिवसभर पोलिस ठाण्यात मुक्तपणे वावरत होते.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने सोमवारी (ता. 19) दौंड शहरातील इंदिरानगरमधील जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. त्यात पंडित मल्हारी पटेकर (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) व देविदास बाळासाहेब मुटकुले (रा. दौंड) या राज्य राखीव पोलिस दलातील दोन जवानांसह शशिकांत परमेश्वर खराडे (रा. दौंड), शिवाजी आनंदराव बागल (रा. बंगला साइड, दौंड) आणि अड्डामालक इक्‍बाल बाबूमिया शेख (रा. इंदिरानगर, दौंड) हे पळून गेले होते. 

पोलिसांच्या दफ्तरी फरारी असलेल्यांपैकी इक्‍बाल शेख व शशिकांत खराडे हे दोघे पोलिस ठाण्यात अटकेतील आरोपींच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पोलिस ठाण्यातच मंगळवारी (ता. 20) तळ ठोकून होते. काही पोलिस कर्मचारी व पोलिसांच्या एजंटांशी दोघे सतत संपर्कात होते. पोलिसांनी त्यांना साधा अटकाव केला नाही किंवा अटक करण्याचे धाडसदेखील दाखविले नाही. 

दौंड पोलिसांनी या छाप्यात एकूण 11 जणांना अटक केली असून, 5 जण फरारी आहेत. छाप्यात 1 लाख 16 हजार रुपयांची रोकडसह एकूण 2 लाख 12 हजार 730 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT