Pune_University 
पुणे

Video: पुणे विद्यापीठाच्या बैठकीत ABVPचा खोडा; परीक्षा फीवर विद्यापीठ गप्प

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात घुसून घोषणाबाजी करत कामकाजात अडथळा निर्माण केला. 

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक मुख्य इमारतीतील सभागृहामध्ये सुरू झाली झाली. त्यावेळी परीक्षा शुल्क माफीच्या मुद्द्यावरून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. बैठकीत जाऊन घोषणाबाजी सुरू झाल्याने त्यांना बाहेर जाण्याची विनंती कुलगुरूंनी केली, पण कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. 
गेल्या सहा महिन्यांपासून परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करीत आहेत,  त्याच्यावर अजून कोणताही निर्णय नाही. विद्यापीठाच्या स्वायत्तत्तेवरती शासनाकडून गदा आणली जात आहे आणि विद्यापीठ यावर गप्प आहे.

विद्यार्थ्यांच्या पैशांवर राजकीय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ऑनलाइन परीक्षेच्या पूर्वी विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा कोणताही निर्णय नाही या मागण्या केल्या. तसेच विद्यापीठाने परीक्षा शुल्क परत करण्याविषयी या बैठकीत निर्णय करावा, अन्यथा ही बैठक होऊ देणार नाही, असा पावित्रा घेतला. यावेळी व्यवस्थापन समिती सदस्यांनीही अशा पद्धतीने आंदोलन करणे योग्य नाही असे सांगितले. तरीही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament debate: "राईट टू रिकॉल" म्हणजे काय? काम न करणारे आमदार-खासदार बरखास्त होणार? संसदेत झाली चर्चा

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांचा आज 'भारत बंद'; देशव्यापी बंदमुळे जनजीवनावर परिणाम होणार!

अत्याचार प्रकरणी ४० दिवस कोठडीत, तरी KDMC पालिकेनं दिला पगार; पोलिसांनाही माहिती नव्हतं तो पालिकेत कार्यरत

Solapur Crime: माढा तालुक्यातील नवविवाहितेचा खून; बार्शीच्या सत्र न्यायालयाने जाऊबाईस सुनावली जन्मठेपची शिक्षा!

Rahul Gandhi : ‘भारतमाते’ला विकले; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्ला

SCROLL FOR NEXT