accident at Panchami Hotel Chowk chamber overflowed oil mixed with water pune traffic police sakal
पुणे

Accident News : पंचमी हॉटेल चौकात चेंबर तुंबून ऑईल मिश्रित पाणी रस्त्यावर, वाहने घसरून अपघात

पंचमी हॉटेल चौकात सांडपाणी वाहिन्यांचे मुख्य चेंबर आहेत, तुंबलेल्या चेंबरची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल

सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी : सातारा रस्त्यावरील पर्वती दर्शन येथील पंचमी हॉटेल चौकात सांडपाणी वाहिन्यांचे दोन चेंबर तुंबून रस्त्यावरून ऑईल मिश्रित पाणी वाहत आहे, पाण्यामुळे वाहने घसरून पडून अपघातात काही नागरिक जखमी झाले.

चौकातील बीआरटी मार्गाच्या सुरवातीला समोरासमोर दोन सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर आहेत, चेंबर तुंबून रस्तावर ऑईल मिश्रित पाणी आले त्यावरून वाहने घसरून अपघात होत होते, पंचमी हॉटेल च्या वळणाच्या रस्त्यावर वाहनचालकांना अंदाज येत नव्हता त्यामुळे येथे अनेक वाहनचालक घसरून पडले काही सजग नागरिकांनी पाण्यावर माती टाकून चेंबरवर बॅरिकेड लावले त्यामुळे वाहन चालकांना निसरड्या रस्त्याचा अंदाज येऊन पुढील अपघात टळले.

चौकातील बीआरटी मार्गात एसटी कॉलनी बसथांब्या जवळ चेंबर खचलेले असून मोठा खड्डा तयार झाला आहे पीएमपीएल च्या बस चालकांना मोठय़ा शिताफीने बस चालवताना चौकातील दोन चेंबरचे खड्डे व बीआरटी मार्गातील खड्डा चुकवावा लागतो अन्यथा बस खड्ड्यात घालावी लागते नाहीतर कठड्याला घासते.

पंचमी हॉटेल चौकात महापालिकेच्या बिबवेवाडी, सहकार नगर धनकवडी व कसबा विश्रामबाग अशा तीन क्षेत्रीय कार्यालयाची हद्द येते त्यामुळे अनेक वेळा हद्दीच्या कारणामुळे कामांना अडथळा येतो, त्यातच बीआरटी मार्गाची कामे मुख्य खात्याकडून केली जातात त्यामुळे समन्वया अभावी कामांना अधिक विलंब होतो.

पंचमी हॉटेल चौकात सांडपाणी वाहिन्यांचे मुख्य चेंबर आहेत, तुंबलेल्या चेंबरची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, बीआरटी मार्गातील चेंबर बाबत मुख्य खात्याला माहिती कळविण्यात येईल अशी माहिती कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता सूर्यकांत वाल्मिक यांनी दिली.

पंचमी हॉटेल चौकातील चेंबर तुंबून ऑइल तेल मिश्रित पाणी रस्त्यावर येऊन वाहने घसरून अपघात होत होते, काही सजग नागरिकांनी पाण्यावर माती टाकून चेंबरवर अडथळा लावल्यामुळे पुढील अपघात टळल्याचे येथील रहिवासी कपिल नांगरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात आठ विधेयके केली जाणार सादर

Sarpanch Election : गावगाड्यातल्या राजकारणात बदल होणार, कोल्हापूर जिल्ह्यात १०२६ सरपंचांचे पुन्हा आरक्षण

Israel Strike On Syria : सीरियावर इस्त्रायलयचा सर्वात मोठा हल्ला; गाझा अन् इराण नंतर का केले लक्ष्य?

Monsoon Update: मराठवाड्यात पावसाची चाहूल; नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता, जाणून घ्या कसे असेल हवामान?

Silver Rate Today: चांदीचा भाव 2 लाख रुपये होणार? 6 महिन्यांत इतकी वाढली किंमत; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT