Pune Accident News Esakal
पुणे

Pune Accident News: पुण्यातील पिंरगुट घाटात काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात; टेम्पोची ६ वाहनांना धडक, ७ जण जखमी

पुणे कोलाड महामार्गावरील पिरंगुट घाटामध्ये टेम्पोने सहा वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याचदरम्यान पुण्यातून एका भीषण अपघातची माहिती समोर आली आहे. पुणे कोलाड महामार्गावरील पिरंगुट घाटामध्ये टेम्पोने सहा वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या भाषण अपघातात मोठी जीवित हानी टळली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यात काळजाचा ठोका चुकवणारी अपघाताची दृश्य दिसत आहेत. संबधित टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत टेम्पो चालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर पौंड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या अपघातामध्ये एकूण ७ जण जखमी झाले आहेत. पुणे कोलाड महामार्गावर पिरंगुट येथील घाट उताऱ्यावर बाजूने सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या या टेम्पोने पाच दुचाकी व एका चार चाकी वाहनांला धडक दिली.

अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते की, एक व्यक्ती आपली स्कूटर काढत असताना अचानक भरधाव टेम्पो येतो आणि त्यासह सहा वाहनांना धडक देतो. टेम्पो त्याकडे येत असल्याचे पाहून तो थोडा सावध होतो आणि वेळीच स्कूटर सोडून जवळच उभ्या असलेल्या दोन कारच्या मध्ये जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT