Accident
Accident 
पुणे

...अन्‌ सुखाला दृष्ट लागली

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - मुलीचे लग्न ठरले... सुपारीही फुटली... लग्नासाठी हॉल बुक केला. दागदागिने, कपड्यांची खरेदी झाली. लग्नपत्रिका छापून आल्या. शनिवारपासून त्यांचे वाटपही होणार होते. यामुळे पिंपरीतील हरिहर कुटुंब आनंदात होते. मात्र त्यांच्या या सुखाला दृष्ट लागली. शुक्रवारी (ता. २६) पिंपरी पुलावर झालेल्या अपघातात घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला अन्‌ आनंदावर विरजण पडले. या घटनेमुळे पिंपरी परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

विजय कुंडलिक हरिहर (वय ५२, रा. पिंपरी) हे महाविरणमध्ये कामाला होते. त्यांना वृषाली आणि विनोद ही दोन मुले. त्यांनी मुलांना उच्चशिक्षित केले. वृषालीच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरू झाले. तिच्यासाठी चांगले स्थळही आले आणि एक एप्रिलला सुपारी फोडून लग्नासाठी ३१ मे तारीख ठरविण्यात आली. लाडक्‍या मुलीचा विवाह होणार असल्याने हरिहर कुटुंब झपाटून कामाला लागले. नवी सांगवीतील संस्कृती लॉन विवाहाकरिता बुक करण्यात आला. दहा दिवसांपूर्वी लग्नाचा बस्ताही बांधला. आवश्‍यक ती खरेदीही सुरू होती. लग्नाच्या पत्रिकाही छापून आल्या. लग्नाची इतर तयारी आणि नातेवाइक, मित्रमंडळींना पत्रिका देता याव्यात यासाठी विजय यांनी १ मे ते ९ जून असा रजेसाठी अर्जही तयार केला. शनिवारपासून पत्रिका वाटण्यास सुरवात करणार होते. मात्र त्यांचे हे सुख कदाचित नियतीलाही मान्य नसावे. कामावरून घरी येत असताना शुक्रवारी दुपारी विजय यांच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. 

या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि आनंदात असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांचा अपघात झाल्याचे समजताच मुलगा विनोद याने वायसीएम रुग्णालयात धाव घेतली. त्यांचा मृतदेह पाहताच भोवळ येऊन कोसळला. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती आसपासच्या नागरिकांना कळताच परिसरात शोककळा पसरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT