bus1.jpg 
पुणे

पुणे : बस चालकाचे नियंत्रण सुटले अन्‌ पहा काय घडले... 

सकाळवृत्तसेवा

विश्रांतवाडी (पुणे) : लॉकडाउनमुळे सध्या रस्त्यावर जरी रहदारी कमी असली, तरी जाणारी वाहने भरधाव वेगाने जात आहेत. परिणामी, अनेक छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. असाच एक अपघात शुक्रवारी सायंकाळी विश्रांतवाडी चौकात घडला. 

आळंदीवरून विश्रांतवाडीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मिनीबस चालकाचे नियंत्रण सुटल्याने विश्रांतवाडी चौकातील बीआरटीच्या बॅरिकेडसला जाऊन धडकली. बसच्या एका बाजूला कार होती. या दोन गाड्यांच्या मधून एका दुचाकीस्वाराने दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला.

रस्ता रुंद असल्याने अचानक आलेल्या या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस बॅरिकेडसला धडकली. 

या घटनेत बस आणि बॅरिकेडसचे काही प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या ठिकाणी रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या संदर्भात विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण आव्हाड यांनी सांगितले, "दुचाकीस्वाराला वाचविताना हा अपघात घडला असून त्या बसचालकाचेच नुकसान झाले असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही.' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: दरवाजात उभं राहण्यावरुन वाद, रागात तरुणाला धावत्या लोकलमधून खाली ढकललं; बोरीवली स्थानकात थरार

Viral Video: स्टंपची अदलाबदल केली राव, तरी विकेट काही मिळेना! ध्रुव जुरेलचा भन्नाट जुगाड; VIDEO तुफान व्हायरल

१९ दिवसांपूर्वी लग्न, पती रक्षाबंधनला पत्नीला माहेरी सोडायला निघाला; मिठाई आणायला गेला अन्... नववधू प्रियकरासोबत फरार

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गावरून राजू शेट्टी आक्रमक

Nepal Flood: नेपाळमध्ये जलप्रलय! ठाण्यातील नऊ पर्यटक बेपत्ता, तर रायगडमधील ३७ जण अडकले

SCROLL FOR NEXT