Accident News Esakal
पुणे

Accident News: ओव्हरटेक करत असतानात धावत्या कारवर आयशर टेम्पो कोसळला अन् काही क्षणातच अख्खं कुटुंबच संपलं

पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यासह देशभरात भीषण अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर काल (रविवारी) रात्रीच्या सुमारास भीषण अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कारवर आयशर टेम्पो कोसळला. ओव्हर टेक करत असताना झालेल्या या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आङे. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ घडली आहे. या भीषण अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सुनील धारणकर (वय 48 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आणि अभय सुरेश विसाळ अशी अपघातातील मृत व्यक्तींची नावे आहेत. तर अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. ते पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघाले होते. संगमनेर परिसरातून ते जात असतानाच समोरून जात असलेल्या आयशर टेम्पोला कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचक्षणी आयशर टेम्पो कारवर कोसळला

या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी देखील वेळेवर घटनास्थळी धाव घेतल्याने एका महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका दोन वर्षीच्या चिमुकलीचाही समावेश आहे. या घटनेनंतर नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे हळहळ वक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT