cctv.jpg
cctv.jpg 
पुणे

सीसीटीव्हीमुळे टळला अपघात; पुणे-मुंबई रेल्वेरुळावर कोसळला दगड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे गाडी या दगडाला धडकण्याआधीच थांबविण्यात आली त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. हा दगड 2.3 मीटर लांब, 1.6 मीटर उंच आणि 2.2 मीटर रुंद होता. 

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर घाट भागामध्ये लोणावळ्याजवळ रात्री साडेआठच्या सुमारास हा दगड रुळावर पडला. त्यावेळी या मार्गावरून जाणारी मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्‍स्प्रेस दोन तास थांबवून ठेवण्यात आली होती. खंडाळ्यामध्ये मंकी हिलजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दगड कोसळण्याची ही घटना कैद झाली. दरड कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी घाट मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

कर्जत-लोणावळ्यामधील घाट मार्गावर नियमित तपासणी सुरू असते. मंकी हिल-खंडाळा घाटादरम्यान 12 किलोमीटरच्या मार्गावर 43 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच घाट भागामध्ये सुमारे 200 कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. घसरणाऱ्या दगडांमुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे मध्य रेल्वेने ड्रोनच्या साहाय्याने या मार्गाचे सर्वेक्षणही केले आहे. 2017 मध्ये दरड कोसळण्याच्या तीन घटना घडल्या. पण सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नव्हती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT