Pune Accident Esakal
पुणे

Pune Accident: सुट्टीला गेलेली परत आलीच नाही...अपघातात 6 वर्षाची मुलगी वाचली तर आईचा मृत्यू

ट्रक बसवर आदळल्याने झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता.

अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं

या भीषण अपघातात निशा या सहा वर्षांच्या अधिरा या मुलीस घेऊन माहेरी कल्याणला सुटीला जात होत्या. त्यांना काल रात्री पतीने मुंबईला जाणाऱ्या खासगी आराम बसमध्ये बसविले होते. मात्र, रात्रीत त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि यामध्ये माहेरी सुटीला जाणाऱ्या निशा जागीच ठार झाल्या.

त्या सुटीला गेल्या पण परत आल्याच नाहीत, असे शास्त्रीनगरातील स्थानिकांनी सांगितले. अधिरासुद्धा जखमी असून तिलाही रविवारी सायंकाळी मयत निशा यांच्यासोबत दुसऱ्या रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात नेण्यात आले.

अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती

स्वामि नारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने घटनेचा अभ्यास करून सात दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

या समितीमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता हे सदस्य तर, प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव असतील. या ठिकाणांच्या अपघातांबाबत सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेने केलेल्या उपाययोजनांचा अहवालात अंतर्भाव असावा, असेही डॉ. देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.डॉ. देशमुख म्हणाले की, रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून नवले पुलाजवळ होत असलेल्या अपघातांबाबत आढावा घेतला आहे. दरम्यान, डॉ. देशमुख यांनी जखमींची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT