accident  sakal
पुणे

Accident News: मुलीचं पोलीस बनवायचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आलेल्या वडिलांचा दुर्दैवी अंत

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात

रुपेश नामदास

मुलीचं पोलीस बनवायचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुण्यात आलेल्या वडिलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शिवाजीनगरमध्ये पोलिस भरती प्रक्रिया चालू आहे. या ठिकाणी राज्यातील विविध भागातून या ठिकाणी मुलं मुली येत आहेत. दरम्यान आपल्या मुलीला पोलीस बनवायचं स्वप्न पाहणाऱ्या वडिलांचा पुण्यात अपघात झाला आहे. सुरेश सखाराम गवळी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गवळी यांची मुलगी ज्योती ही गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत होती. पोलिस भरती प्रक्रियेची तारीख कळाल्यानंतर सुरेश गवळी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसह नाशिकहून पुण्यात आले. काल रात्री पुण्यात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर परिसरात एका फुटपाथवर मुक्काम केला.

पहाटे दोनच्या दरम्यान मुलीला ग्राउंडला सोडल्यानंतर ते शिवाजीनगर परिसरात चहा पिण्यासाठी पायी जात असलेल्या गवळी यांच्यावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने उडवलं यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबतचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस असून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अर्जुन नाईकवाडे हे तपास अधिकारी म्हणून काम करत आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनचा या घटनेचा सी सी टिव्ही फुटेज समोर आलं असून त्या अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

Flood News : कोरेगाव मुळ बंधाऱ्यावरून दुचाकीसह ज्येष्ठ वाहून; एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

Pune News : ‘आर्किटेक्ट’ पदवीचा बेकायदेशीर वापर महागात; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा कठोर इशारा

Beed Crime: बीडच्या कारागृहात ठाराविक कैद्यांचे लाड! खासदार सोनवणे अमित शाहांच्या भेटीला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Flood Alert : डिंभे धरणातून घोड नदीत १९,५४५ क्यूसेक विसर्ग; नदीकाठच्या ४४ गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT