crime 
पुणे

सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी; केली बहिणीच्या घरी चोरी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आजारी आईला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेच्या भावानेच तिच्या घरामध्ये चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी (ता.१६) सायंकाळी पाच वाजता महंमदवाडी येथे घडली.

मोबाईल, एटीएम कार्ड असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या भावाला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नितीन शिवाजी भाकरे (वय 35, रा. टाकळी हाजी, माळवाडी, शिरुर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या आई आजारी असल्यामुळे त्या रविवारी त्यांच्या आईला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादीच्या घरी त्यांचा सख्खा भाऊ व त्याच्यासमवेत एक महिला आली होती. त्यावेळी फिर्यादी घरी नव्हत्या. त्यामुळे आरोपीने त्यांच्या घरातील 37 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल, घरातील चाव्या, एटीएम कार्ड असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

फिर्यादी घरी परतल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस कर्मचारी सुरेखा साबळे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT