पुणे

प्रकाश आंबेडकरांच्या बदनामीप्रकरणी आरोपीस अटक व न्यायालयीन कोठडी

भरत पचंगे

शिक्रापूर : सोशल मिडीयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केलेला आकाश नंदू नवले या युवकावर अ‍ॅट्रोसिटी दाखल करुन शिक्रापूर पोलिसांनी त्याला कोतूळ (ता. अकोले, जि. नगर) येथून अटक केली. दरम्यान त्याला शिरुर न्यायलायाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट यांनी दिली.

आकाश नंदू नवले (वय २५, रा.जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) असे नाव असलेल्या युवकाने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सोशल मिडीयावर बदनामी केल्याने त्यांचेवर शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली होती. याच अनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी राहूल धस व पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दोन पथके तयार केली व ती नवले याच्या शोधार्थ पाठविली. यातील एका पथकाला आरोपी नवले हा कोतुळ (ता.अकोले, जि. नगर) येथे मिळून आला. त्याला शिरुर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी नवनाथ रानगट यांनी दिली.

दरम्यान समाजकारण, धार्मिक, ऐतिहासिक आणि राजकारणातील कुणाही व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर कुणी टाकल्यास त्या सहन केल्या जाणार नाहीत. अशा कुठल्याही तक्रारींबाबत आपण गंभीर असून शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व सोशल मिडीयावर सक्रीय असणारांनी सजग राहण्याचे आवाहन यावेळी पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी केले.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT