पुणे

आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोल्हापूर येथील ओंकार इंडस्ट्रीज येथून 388 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना आश्रय व आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत शकते, असे नमूद करीत न्यायालयाने याप्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशेष न्यायाधीश (एनपीडीसी) व्ही. पी. आदोणे यांनी हा आदेश दिला. पुणे कस्टम्स नार्कोटिकस सेल विभागाने 2015मध्ये ही कारवाई केली होती. नजीर सांगे, रवींद्र कोंडुसकर, अयुब मकानदार, अयुब लाला खान आणि सचिन बागूल अशी याप्रकरणातील आरोपींची नावे आहेत. या छाप्यामध्ये सुरवातीस 50 किलो व नंतर 338 किलो मेफेड्रोन जप्त केले होते. त्याची किंमत 40 कोटी रुपयांच्या घरात आहे.

न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. नार्कोटिकस सेल विभागाच्यावतीने विशेष सरकारी वकील ऍड. संदीप घाटे यांनी आरोपींच्या जामिनास विरोध केला. आरोपी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात थंडीचा कडाका वाढला! तापमानात ५ अंशांची घसरण, पारा थेट १३ अंशांवर; नागपूरसह अनेक जिल्ह्यांत हुडहुडी

एसटी चालक-वाहकाचा मनमानी कारभार! विद्यार्थिनींना रात्री अंधारात अर्ध्या रस्त्यात उतरविलं, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून २०३५ पर्यंतचं वेळापत्रक जाहीर; भारतात कधी होणार वर्ल्ड कप?

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT