Crime-Murder 
पुणे

सराईत गुन्हेगाराचा खून करून त्यांनी घरामागे पुरला मृतदेह; दारू पिऊन द्यायचा त्रास

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कात्रज परिसरात एका सराईत गुन्हेगार खून करून घराच्या आवारातच मृतदेह पुरल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता.२२) उघडकीस आला होता. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी खून करणाऱ्या एका आरोपीस तत्काळ बेड्या ठोकल्या. सराईत गुन्हेगार सतत त्रास देत असल्याच्या कारणातून त्याचा खून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

किरण डोळे असे खून झालेल्याचे नाव आहे. तर ओंकार संजय जोरी (रा. दुगड चाळ, कात्रज) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने डोळे याचा खून केला होता. यानंतर त्याचा मृतदेह घराच्या मागच्या बाजूला गाडला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण डोळे हा सराईत गुन्हेगार होता. त्यास दोन वर्षापूर्वी तडीपार करण्यात आले होते. तो त्याच्या आई, वडील आणि पत्नीसोबत आगम टेकडी परिसरातील अय्याप्पा स्वामी मंदिरालगतच्या जुन्या दुगड चाळीत राहत होता. सहा महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. किरण याचे त्याच परिसरात राहणारे त्याचे मित्र ओंकार जोरी, समीर जोरी, गजानन पासलकर, प्रतीक डाकले यांच्या घरी जाणे येणे होते. १६ ऑगस्टला किरण संध्याकाळी घरातून गेला, मात्र त्यानंतर तो माघारी परतला नाही. त्यामुळे त्याची पत्नी प्रियांका डोळे हिने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. दोन दिवस पोलिसांनी केलेल्या तपासात जोरीचे घर कुलूपबंद असल्याचे दिसले. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा, जोरी आणि त्याचा भाऊ आजीसह सोळा तारखेलाच पसार झाले. पोलिसांनी जोरी याच्या घरात तपासणी केली, तेव्हा घराच्या परिसरातील एका खोलीतून दुर्गंधी आली. त्यामुळे तेथे मृतदेह पुरून ठेवल्याचा संशय पोलिसांना आला. दरम्यान घरामागील अंगणात खोदल्यानंतर पोलिसांना डोळेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे करत आहेत.

म्हणून डोळेचा केला खून 
डोळे सराईत गुन्हेगार होता. त्याचबरोबर त्याला दारुचे व्यसन होते. तो दारू पिण्यासाठी सतत आरोपींच्या घरी जात होता. दारू पिल्यानंतर तो जोरी आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देत होता. १६ ऑगस्टलाही तो दारू पिण्यासाठी जोरीच्या घरी गेला होता. तेथे त्यांच्यात वाद झाल होते. त्यानंतर जोरी आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या डोक्‍यात धारदार वस्तूने वार करून त्याचा खून केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Nanded Crime: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणे भोवले! वाई बाजारच्या पूजा मेडिकल्स परवाना निलंबित; सहाय्यक आयुक्तांची कारवाई!

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT