Pune  sakal
पुणे

Pune Crime News : विद्यार्थ्याच्या अंगावर फेकले ॲसिडसदृश रसायन

वसतिगृहातील खोलीत झोपेत असलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन फेकल्याची घटना रेंजहिल्स भागात घडली. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वसतिगृहातील खोलीत झोपेत असलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन फेकल्याची घटना रेंजहिल्स भागात घडली. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आशिषकुमार नरेंद्रकुमार दास (वय २४, रा. सिंबायोसिस मुलांचे वसतिगृह, रेंजहिल्स) याने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार विद्यार्थी रेंजहिल्स परिसरातील सिंबायोसिस मुलांच्या वसतिगृहात राहतो. तो शनिवारी (ता. २३) रात्री खोलीत झोपला होता. त्यावेळी रात्री साडेआठच्या सुमारास एकजण वसतिगृहातील खोलीत शिरला. त्याने प्लास्टिकच्या मगमध्ये ॲसिडसदृश रसायन भरून आशिषकुमारच्या अंगावर फेकले. शरीराचा दाह झाल्यामुळे आशिषकुमारने आरडाओरडा करीत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खोलीच्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली होती.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वसतिगृहातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. वसतिगृहातील एखाद्या विद्यार्थ्याने खोडसाळपणा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रुईकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT